Firing In Indapur | गोळीबाराने इंदापूर पुन्हा हादरले ! तरुणावर चार गोळ्या झाडल्या

firing

पुणे : Firing In Indapur | इंदापूर शहर पुन्हा एकदा गोळीबाराने हादरले. दुचाकीवरुन आलेल्या एकाने तरुणावर गोळीबार केला. भर चौकात हा गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली. इंदापूर शहरातील वीजपुरवठा खंडीत झाला असताना इंदापूर महाविद्यालयासमोर ही घटना सोमवारी सायंकाळी पावणे सात वाजता घडली. (Indapur Crime News)

https://www.instagram.com/p/DAi797FCK_K

राहुल अशोक चव्हाण (वय २५, रा. शिरसोडी, ता. इंदापूर)असे या गोळीबारात जखमी झालेल्याचे नाव आहे. हल्लेखोराने एकूण चार गोळ्या झाडल्या. त्यापैकी तीन गोळ्या राहुल याच्या पाठीला लागल्या आहेत. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहे.

https://www.instagram.com/p/DAkdEHzJUMQ

राहुल हा शिरसोडी येथील रहणारा आहे. पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण देणारी अ‍ॅकेडमी राहुल याचा भाऊ चालवतो. या हल्ल्यामागील कारण अद्याप समोर आले नाही. इंदापूर पोलीस (Indapur Police) घटनास्थळी दाखल झाले असून हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे. (Firing In Indapur)

https://www.instagram.com/p/DAkal4qJcHk

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Nirmala Sitharaman | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपात FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; राजकीय वर्तुळात खळबळ

Supriya Sule On Mahayuti Govt | सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला इशारा; म्हणाल्या – ‘जेव्हा निवडणुका होतील तेव्हा…’

Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)

You may have missed