Flipkart करतंय यूपीआय बेस्ड अॅप्स सोबत स्पर्धा, आता अॅपमध्ये सुरू झाल्या 5 नवीन कॅटेगरी
नवी दिल्ली : Flipkart | भारतीय ई-कॉमर्समध्ये पाया मजबूत केल्यानंतर आता फ्लिपकार्ट (Flipkart) ने डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्ममध्ये सुद्धा पाऊल टाकले आहे. डिजिटल पेमेंटमध्ये विस्तार करण्याबाबत फिल्पकार्टने आज सांगितले की, डिजिटल सोल्यूशन कंपनी बिलडेस्क (Billdesk) सोबत भागीदारी केली आहे. या भागीदारीनंतर फ्लिपकार्ट अॅपमध्ये ५ नवी कॅटेगरीचा समावेश केला आहे.
फ्लिपकार्ट अॅपवर फास्टॅग, डीटीएच रिचार्ज, लँडलाईन, ब्रॉडबँड आणि मोबाईल पोस्टपेड बिल पेमेंटसह रिचार्ज आणि बिल पेमेंट कॅटेगरीचा समावेश केला आहे.
फ्लिपकार्टने भारतातील प्रमुख पेमेंट सोल्यूशन कंपन्यांपैकी एक असलेल्या, बिलडेस्क सोबत भागीदारी केली आहे, जेणेकरून भारत बिल पेमेंट्स सिस्टम (BBPS) सोबत नवीन सेवा एकत्र देण्यास मदत होईल. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे भारत बिल पेमेंट सिस्टम (बीबीपीएस) विकसित केली आहे.
यावर्षी मार्चमध्ये फ्लिपकार्टने अॅक्सिस बँक (Axis Bank) सोबत भागीदारी केली. यामध्ये फ्लिपकार्टने मार्केटप्लेसच्या आत आणि बाहेर ऑनलाइन और ऑफलाईन मर्चेंट ट्रांजक्शनसाठी आपले UPI हँडल @fkaxis लाँच केले.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Reliance Retail | अनंतच्या विवाहापूर्वी नवीन बिझनेस सुरू करण्याची तयारी,
‘या’ व्यवसायात एंट्री करणार मुकेश अंबानी, चीनची कंपनी आणणार भारतात
Pune Crime News | पुणे: गाडीत बसण्यास नकार दिल्याने अश्लील शिवीगाळ करुन असभ्य वर्तन, एकाला अटक
Gautam Gambhir | गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक, जय शाहांची घोषणा
Pune Bopodi Hit & Run Case | पुणे पोलीस हवालदार मृत्यू प्रकरण : कारमधील तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात,
कारला ओव्हरटेक केल्याचा आला राग, भरधाव वेगात कार चालवली अन्…