Flood Victims In Pune | पुण्यातील पूरग्रस्तांना २५ हजार रुपयांची मदत देण्यासाठी सकारात्मक विचार सुरु

Pune Flood

पुणे : Flood Victims In Pune | जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यासह शहरात अतिवृष्टी झाली. त्यामुळे धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पुणे व परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. या पुरामुळे मुठा नदीकाठी (Mutha River) राहणाऱ्या अनेकांच्या घरात पाणी शिरले. अनेकांच्या गाड्यांचे नुकसान झाले.

याबाबत बोलताना पुणे जिल्हाधिकारी म्हणाले,”पूरग्रस्तांना पैसे देण्यासाठी राज्यसरकारकडे मागणी केली असून दोन-तीन दिवसात मदतीचे वाटप सुरु होईल. ज्यांचे पंचनामे झाले नाहीत, त्यांचे पंचनामे नव्याने करून त्यावर कार्यवाही केली जाईल. कोणाही पुरग्रस्ताला वाऱ्यावर सोडले जाणार नाही. सध्या अन्नधान्य किट वाटप सुरु असून त्यामध्ये आणखी वाढ करण्यात येणार आहे.

पूरग्रस्तांना २५ हजार रुपयांची मदत देण्यासाठी सकारात्मक विचार सुरु असून लवकरच याबाबतीत निर्णय घेतला जाईल”, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे (Suhas Diwsae) यांनी पूरग्रस्तांना दिले.

नुकत्याच झालेल्या संततधार पावसामुळे शहरातील काही भागांना पुराचा मोठा फटका बसला. या पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून हजारोंच्या संख्येने निघालेला हा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय, सिंचन भवन आणि पुणे महापालिका असा धडकला.

संजय सोनवणे म्हणाले, “शहरातील जवळपास दहा हजार कुटुंबे पुरामुळे बाधित झाली आहेत. राज्य सरकारकडून त्यांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. येत्या काळातही नदीकाठच्या वस्त्यांवर पुराची टांगती तलवार असणार आहे. त्यामुळे पुन्हा पूरस्थिती उद्भवू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करावेत. त्यामध्ये प्रत्येक कुटुंबास २५ हजार रुपयांची तातडीची मदत करावी, पूरस्थितीला कारणीभूत ठरणारी अतिक्रमणे तत्काळ काढावीत, पूररेषा (रेडलाईन, ब्लू लाइन) नव्याने आखण्यात यावी,आपत्कालीन व्यवस्थापन समिती सक्षम करावी, पाण्याचा विसर्ग करण्याला पर्यायी मार्ग तयार करावा”, अशा मागण्या त्यांनी केल्या.

महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले, “नदी सुधार प्रकल्पाचा पुनर्विचार करू.
तसेच नव्याने ब्लू लाइन व रेड लाइन निश्चित करणार आहोत.
नाले आणि नदीपात्रातील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरू केलेली असून, लवकरच पाणी जाण्याचे मार्ग खुले होतील.
कॅनॉलमधून पाणी ओसंडणे थांबविण्यासाठी फुरसुंगीपर्यंत जमिनीखालून पाइपलाइन टाकण्याचे काम लवकरच होईल”, असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी रिपाइंचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव,
माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सुनीता वाडेकर, प्रदेश संघटक परशुराम वाडेकर, ऍड. मंदार जोशी,
माजी नगरसेवक अशोक कांबळे, महेंद्र कांबळे उपस्थित होते.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ramtekdi Pune Crime News | रामटेकडी परिसरात गुंड राजू शिवशरणचा दगडाने ठेचून खून; पैसे मागितल्यावरुन झाला राडा

Maharashtra Assembly Election 2024 | आमदारांची धाकधूक वाढली; फडणवीस म्हणाले –
“निवडून येणाऱ्या आमदारालाच तिकिट”

Sahakar Nagar Pune Crime News | उसने घेतलेले पैसे परत न करता अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी

Vinesh Phogat | कुस्तीपटू विनेश फोगटची तडकाफडकी निवृत्ती; म्हणाली – ” स्वप्न, धैर्य, सर्व काही तुटले..”

Pune Crime Court News | गांजा विक्री प्रकरणातील सिव्हिल इंजिनिअरला जामीन

You may have missed