Footwear prices Hike | बूट, सँडल आणि चप्पल 1 ऑगस्टपासून होणार महाग, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : Footwear prices Hike | ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डने बाजारात विकल्या जाणार्या सर्व पादत्राणांसाठी नवीन क्वालिटी स्टँडर्ड जारी केले आहे. बीआयएसच्या नव्या मानकांनुसार बनविलेली पादत्राणे जास्त मजबूत आणि टिकाऊ तर असतीलच, परंतु सोबतच महागसुद्धा होतील. नवीन मानक लागू झाल्याने 1 ऑगस्टपासून बूट, सँडल आणि चप्पल महाग होणार आहे.
या स्टँडर्डमध्ये बुटांची क्वालिटी, वापरले जाणारे साहित्य आणि सुरक्षेसारख्या अनेक बाजूंवर लक्ष दिले आहे. बीआयएसने स्पष्ट केले आहे की, नवीन नियमांचे पालन न करणार्या कंपन्यांवर कारवाई होऊ शकते.
या नियमातून छोट्या कंपन्यांना तुर्तास दिलासा देण्यात आला आहे. वार्षिक 50 कोटी रुपयांपेक्षा कमी व्यवसाय असलेल्या कंपन्यांना सध्या या मानकांचे पालन करावे लागणार नाही. तसेच, जुन्या स्टॉकमधील पादत्राणे या नियमाच्या कक्षेच्या बाहेर असतील, परंतु या पादत्राणांची माहिती बीआयएसच्या वेबसाईटवर अपलोड करावी लागेल.
नव्या नियमानुसार, पादत्राणे बनविणार्या कंपन्यांना आता बीआयएसचे दोन नवीन स्टँडर्ड आयएस 6721 आणि आयएस 10702 चे पालन करावे लागेल. हे नवीन नियम लागू झाल्याने पादत्राणांच्या किमतीत वाढ होणार आहे. (Footwear prices Hike)
कारण कंपन्यांना नवीन स्टँडर्डनुसार पादत्राणे बनविण्यासाठी जास्त खर्च येईल.
1 ऑगस्टपासून पादत्राणांसंबंधीत 46 वस्तुंवर नवीन नियम लागू होतील.
ब्यूरोने लोकांच्या माहितीसाठी नवीन नियम वेबसाईटवर उपलब्ध केले आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Yashshree Shinde Murder Case | यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून अटक
BJP MLA Siddharth Shirole | भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार
Swikruti Pradeep Sharma Join Shivsena | एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात ‘एन्ट्री’;
शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश