Former MLA Kapil Patil | समाजवादी गणराज्य पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार कपिल पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक
मुंबई: Former MLA Kapil Patil | समाजवादी गणराज्य पक्षाचे (Samajwadi Ganrajya Party) अध्यक्ष, माजी आमदार कपिल पाटील यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश केला. कपिल पाटील यांनी निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने स्थानिक काँग्रेस नेत्यांचं टेन्शन वाढलं आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
कपिल पाटील हे गोरेगाव मतदारसंघातून (Goregaon Assembly) निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. शिवसेना पक्षातर्फे या मतदारसंघातून समीर देसाई (Sameer Desai) प्रयत्नशील आहेत. तर काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते युवराज मोहिते उमेदवारीसाठी उत्सुक होते.
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा (MVA Seat Sharing Formula) तिढा अद्याप सुटलेला नाही.
त्यामुळे कपिल पाटील महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) उमेदवारी मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Mumbai High Court News | ’50 खोके एकदम ओके’ ची घोषणा गुन्हा नाही, हायकोर्टाने फटकारले;
सरकारने अपेक्षा भंग केल्यास उद्रेक तर होणारच – हायकोर्टाचे निरीक्षण
Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?