Friendship Cup 2025-Punit Balan Group (PBG) | पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित चौथी ‘फ्रेंडशिप करंडक’ 2025 क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा !!

मंडई मास्टर्स, समर्थ चॅलेंजर, गरूड स्ट्रायकर्स, श्रीराम पथक, नादब्रह्म सर्ववादक, महालक्ष्मी मॅव्हरिक्स्, शिवमुद्रा ब्लास्टर्स संघांची विजयी सलामी !!
पुणे : Friendship Cup 2025-Punit Balan Group (PBG) | पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या संघांचा समावेश असलेल्या चौथ्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत मंडई मास्टर्स, समर्थ चॅलेंजर, गरूड स्ट्रायकर्स, श्रीराम पथक, नादब्रह्म सर्ववादक, महालक्ष्मी मॅव्हरिक्स् आणि शिवमुद्रा ब्लास्टर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली.
सहकारनगर येथील ल.रा. शिंदे हायस्कूल येथील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत अर्थव याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मंडई मास्टर्स संघाने जर्नादन जायंट्स संघाचा १० गडी राखून सहज पराभव केला. मॅक परदेशी याने केलेल्या अष्टपैलु खेळीमुळे समर्थ चॅलेंजर संघाने गतविजेत्या साई पॉवर हिटर्स संघाचा ६२ धावांनी सहज पराभव करून विजयी सलामी दिली. चैतन्य याने केलेल्या अष्टपैलु खेळीच्या जोरावर गरूड स्ट्रायकर्स संघाने दगडुशेठ वॉरीयर्स संघाचा ७ गडी राखून पराभव केला.
सागर पुरी याने केलेल्या नाबाद ७४ धावांच्या मदतीने श्रीराग पथक संघाने भगतसिंग लिजंड्स संघाचा ५२ धावांनी सहज पराभव करून शानदार सुरूवात केली. सॅम मोगल याने फटकावलेल्या नाबाद ७१ धावांच्या खेळीमुळे नादब्रह्म सर्ववादक संघाने साई पॉवर हिटर्स संघाचा ७ गडी राखून पराभव करून विजयी सलामी दिली. रूपक तुबाजी याने फटकावलेल्या नाबाद ८० धावांच्या खेळीमुळे गतवर्षीच्या उपविजेत्या शिवमुद्रा ब्लास्टर्स संघाने युवा योद्धाज् संघाचा ८२ धावांनी सहज पराभव करून सुरेख सुरूवात केली. शिवम पाटील याने केलेल्या ५८ धावांच्या जोरावर महालक्ष्मी मॅव्हरिक्स् संघाने विश्रामबाग नाईट्सचा ५५ धावांनी सहज पराभव केला. (Friendship Cup 2025-Punit Balan Group (PBG))
स्पर्धेचा सविस्तर निकालः गटसाखळी फेरीः
जर्नादन जायंट्सः ८ षटकात ५ गडी बाद ७४ धावा (भुषण इंगळे ३१, शुभम इंगळे २०, ओंकार जोशी २-८, मयुर लकडे २-२०) पराभूत वि. मंडई मास्टर्सः ६.१ षटकात बिनबाद ७५ धावा (अर्थव नाबाद ५० (२०, ३ चौकार, ४ षटकार), सुरज थोरात नाबाद २३); सामनावीरः अर्थव;
समर्थ चॅलेंजरः ८ षटकात ६ गडी बाद १०२ धावा (मॅक परदेशी २४, तन्मय गायकवाड २५, प्रविण इंगळे २३, अनिकेत मोरे १-१३) वि.वि. साई पॉवर हिटर्सः ८ षटकात ७ गडी बाद ६० धावा (आकाश इंदुलकर २७, सुशांत तळेकर १५, मॅक परदेशी १-४, प्रसाद काची १-६); सामनावीरः मॅक परदेशी;
दगडुशेठ वॉरीयर्सः ८ षटकात ९ गडी बाद ७७ धावा (कपिल राऊत २०, यश परदेशी १९, कैलास कांबळे २-७, चैतन्य २-१७) पराभूत वि. गरूड स्ट्रायकर्सः ७.५ षटकात ३ गडी बाद ८२ धावा (विशल गुलमे २९, मुंकूद भोसले नाबाद २६, चैतन्य नाबाद १०, सार्थक घरामळकर १-७, अमोल चव्हाण १-७); सामनावीरः चैतन्य;
श्रीराम पथकः ८ षटकात २ गडी बाद १०८ धावा (सागर पुरी नाबाद ७४ (२७, १ चौकार, ९ षटकार), सिद्धार्थ ढगे १४, राकेश खरावीलकर १-१२) वि.वि. भगतसिंग लिजंड्सः ८ षटकात ८ गडी बाद ५६ धावा (यश तारू २०, पवन बी. १५, सागर पुरी २-१३, मंदार बर्वे २-१३); सामनावीरः सागर पुरी;
साई पॉवर हिटर्सः ८ षटकात ४ गडी बाद ८७ धावा (हुमेद खान ४३, प्रथमेश गोवलकर नाबाद १५, स्वप्निल घाटे २-१०) पराभूत वि. नादब्रह्म सर्ववादकः ७.३ षटकात ३ गडी बाद ९० धावा (सॅम मोगल नाबाद ७१ (२६, ३ चौकार, ९ षटकार), प्रथमेश गोवलकर १-२४); सामनावीरः सॅम मोगल;
शिवमुद्रा ब्लास्टर्सः ८ षटकात १ गडी बाद १३६ धावा (रूपक तुबाजी नाबाद ८० (३०, १० चौकार, ६ षटकार), रोहीत खिलारे ५० (१७, ३ चौकार, ५ षटकार), बापू पलांडे १-६) वि.वि. युवा योद्धाज्ः ८ षटकात ६ गडी बाद ५४ धावा (सागर जगताप ३७, हृषीकेश मोकाशी २-३, रोहीत खिलारे १-८); सामनावीरः रूपक तुबाजी;
महालक्ष्मी मॅव्हरिक्स्ः ८ षटकात ४ गडी बाद १२० धावा (शिवम पाटील ५८ (२५, ५ चौकार, ५ षटकार), ओंकार भोपळे नाबाद २५, राहूल जाधव २-१६) वि.वि. विश्रामबाग नाईट्सः ८ षटकात ७ गडी बाद ६५ धावा (रत्नदीप लोंढे २८, अमीत गव्हाणे ३-१०, अभिजीत देसाई २-१४); सामनावीरः शिवम पाटील;
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
MNS On High Security Number Plate | सरकारने वाहन चालकांकडून खंडणी वसुलीसाठी वापरल्या जाणाऱ्या
‘एच डी नंबर प्लेट’ सक्तीचा फेरविचार करावा; ‘मनसे’ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Kothrud Pune Crime News | शाळेत जातो, असे सांगून 10 वर्षीय मुले घराबाहेर पडली,
घरी न परतल्याने कुटुंबीयांची धावाधाव, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण