Friendship Cup 2025-Punit Balan Group (PBG) | पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित चौथी ‘फ्रेंडशिप करंडक’ २०२५ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा !!

महालक्ष्मी मॅव्हरीक्स्, विश्रामबाग नाईट्स, गजर सुपरनोव्हा, दगडुशेठ वॉरीयर्स, समर्थ चॅलेंजर, नुमवी स्टॅलियन्स्, रंगारी रॉयल्स्, नादब्रह्म सर्ववादक संघांची विजयी कामगिरी !!
पुणे : friendship Cup 2025-Punit Balan Group (PBG) पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या संघांचा समावेश असलेल्या चौथ्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत गजर सुपरनोव्हा, दगडुशेठ वॉरीयर्स, नुमवी स्टॅलियन्स्, रंगारी रॉयल्स्, महालक्ष्मी मॅव्हरीक्स्, विश्रामबाग नाईट्स, समर्थ चॅलेंजर आणि नादब्रह्म सर्ववादक या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी कामगिरी केली.
सहकारनगर येथील ल.रा. शिंदे हायस्कूल येथील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत निलेश एस. याने आणि गोलंदाजांनी केलेल्या अचूक कामगिरीमुळे रंगारी रॉयल्स् संघाने जोगेश्वरी जॅग्वॉर्स संघाचा १० गडी राखून सहज पराभव केला. शुभम बलकवडे याने केलेल्या ५९ धावांच्या जोरावर गजर सुपरनोव्हा संघाने एचएमटी टायगर संघाचा ८ गडी राखून सहज पराभव केला. कपिल राऊत याने केलेल्या अष्टपैलु खेळीमुळे दगडुशेठ वॉरीयर्स संघाने नादब्रह्म ड्रमर्सचा ९ धावांनी पराभव केला. कपिल याने ६५ धावा केल्या आणि ५ धावांमध्ये ३ गडी बाद केले. योगेश खालगांवकर याने केलेल्या नाबाद ६१ धावांच्या जोरावर नुमवी स्टॅलियन्स् संघाने कसबा सुपरकिंग्ज् संघाचा ६९ धावांनी पराभव करून आगेकूच केली.
विवेक जांभुळकर याने केलेल्या नाबाद ३६ धावा आणि गोलंदाजांच्या अचूक कामगिरीमुळे महालक्ष्मी मॅव्हरीक्स् संघाचा १० गडी राखून पराभव करत स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. आतिश गाडे याने केलेल्या नाबाद ८४ धावांमुळे विश्रामबाग नाईट्सने जर्नादन जाएंट्सचा ४ धावांनी पराभव केला. २३० धावांचा पाऊस पडलेल्या सामन्यामध्ये जर्नादन संघाकडून शुभम इंगळे याने सुद्धा एकहाती लढा देताना ८४ धावांची खेळी केली. स्वप्निल घाटे याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर नादब्रह्म सर्ववादक संघाने नादब्रह्म ड्रमर्सचा ८ गडी राखून सहज पराभव करून आगेकूच केली. मॅक परदेशी याने केलेल्या अचूक गोलंदाजी आणि सागर इंदुलकर याने फटकावलेल्या ५४ धावांच्या जोरावर समर्थ चॅलेंजर संघाने गरूड स्ट्रायकर्सचा ३३ धावांनी सहज पराभव केला. (Friendship Cup 2025-Punit Balan Group (PBG))
स्पर्धेचा सविस्तर निकालः गटसाखळी फेरीः
एचएमटी टायगरः ८ षटकात ५ गडी बाद ११५ धावा (अजिंक्य मारटकर ४६, अजित गवळी ४२, विवेक लोहकरे १-१४) पराभूत वि. गजर सुपरनोव्हाः ७ षटकात २ गडी बाद १२२ धावा (शुभम बलकवडे ५९ (१९, ५ चौकार, ६ षटकार), ऋषी बिबवे ३७, संतोष गायकवाड १७, आकाश परदेशी १-१६); सामनावीरः शुभम बलकवडे;
दगडुशेठ वॉरीयर्सः ८ षटकात ३ गडी बाद ८७ धावा (कपिल राऊत ६५ (२७, ३ चौकार, ५ षटकार), संदीप घरमाळकर ११, शुभम नाईकोडे १-६) वि.वि. नादब्रह्म ड्रमर्सः ८ षटकात ७ गडी बाद ७८ धावा (पार्थ नाईकुडे २६, कपिल राऊत ३-५); सामनावीरः कपिल राऊत;
नुमवी स्टॅलियन्स्ः ८ षटकात ३ गडी बाद १२५ धावा (योगेश खालगांवकर नाबाद ६१ (२२, ५ चौकार, ६ षटकार), सोमा खांडेकर नाबाद ३४, तेजस रूपडे १-१३, सागर घोडके १-१५) वि.वि. कसबा सुपरकिंग्ज्ः ८ षटकात ६ गडी बाद ५६ धावा (सम्राट रावटे २१, तन्मय देशपांडे २-१२, बापुसाहेब लोहकरे १-३); सामनावीरः योगेश खालगांवकर;
जोगेश्वरी जॅग्वॉर्सः ८ षटकात ९ गडी बाद ४८ धावा (पुनित आपटे १७, विशाल मुधोळकर २-४) पराभूत वि. रंगारी रॉयल्स्ः २.१ षटकात बिनबाद ५१ धावा (निलेश एस. नाबाद २७ (७, २ चौकार, ३ षटकार), हरनीश दानी नाबाद २१ (७, २ चौकार, २ षटकार); सामनावीरः निलेश एस.;
भगतसिंग लिजंड्सः ८ षटकात ८ गडी बाद ६४ धावा (यश तारू २४, रोहीत गायकवाड १९, ओंकार भोपेळ १-८, राहूल साखरे १-७) पराभूत वि. महालक्ष्मी मॅव्हरीक्स्ः ४.५ षटकात बिनबाद ६५ धावा (विवेक जांभुळकर नाबाद ३६ (१६, ४ चौकार, २ षटकार), शिवम पाटील नाबाद २७ (१३, ५ चौकार); सामनावीरः विवेक जांभुळकर;
विश्रामबाग नाईट्सः ८ षटकात २ गडी बाद ११७ धावा (आतिश गाडे नाबाद ८४ (३२, ५ चौकार, ९ षटकार), राजेश पचकुडवे १७, निलेश दाखवे १-१५) वि.वि. जर्नादन जाएंट्सः ८ षटकात २ गडी बाद ११३ धावा (शुभम इंगळे नाबाद ८४ (३२, ७ चौकार, ७ षटकार), चेतन सी. नाबाद १८, चेतन कसबे १-२०); सामनावीरः आतिश गाडे;
नादब्रह्म ड्रमर्सः ६.५ षटकात १० गडी बाद २९ धावा (क्षतिन भिलारे ८, स्वप्निल घाटे ३-८, सॅम मोगल २-६, विनित कर्नाळकल २-४) पराभूत वि. नादब्रह्म सर्ववादकः ३ षटकात २ गडी बाद ३४ धावा (संकेत कंद नाबाद १३, सॅम मोगल नाबाद १४); सामनावीरः स्वप्निल घाटे;
समर्थ चॅलेंजरः ८ षटकात ७ गडी बाद १०७ धावा (सागर इंदुलकर ५४ (१७, ४ चौकार, ४ षटकार), तन्मय गायकवाड २१, मॅक परदेशी १७, योगेश कुंजीर १-५) वि.वि. गरूड स्ट्रायकर्सः ८ षटकात ८ गडी बाद ७४ धावा (मुकूंद भोसले २२, मॅक परदेशी ४-४, सागर इंदुलकर १-११); सामनावीरः मॅक परदेशी;
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
MNS On High Security Number Plate | सरकारने वाहन चालकांकडून खंडणी वसुलीसाठी वापरल्या जाणाऱ्या
‘एच डी नंबर प्लेट’ सक्तीचा फेरविचार करावा; ‘मनसे’ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Kothrud Pune Crime News | शाळेत जातो, असे सांगून 10 वर्षीय मुले घराबाहेर पडली,
घरी न परतल्याने कुटुंबीयांची धावाधाव, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण