Friendship Cup 2025-Punit Balan Group (PBG) | पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित चौथी ‘फ्रेंडशिप करंडक’ २०२५ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा !!

Friendship Cup

रंगारी रॉयल्स्, शिवमुद्रा ब्लास्टर्स, सुर्योदय रायझर्स, गजर सुपरनोव्हाज्, गुरूजी तालिम टायटन्स्, रमणबाग फायटर्स, साई पॉवर हिटर्स, श्रीराम पथक संघांची विजयी आगेकूच !!

पुणे : Friendship Cup 2025-Punit Balan Group (PBG) | पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या संघांचा समावेश असलेल्या चौथ्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत रंगारी रॉयल्स्, शिवमुद्रा ब्लास्टर्स, सुर्योदय रायझर्स, गजर सुपरनोव्हाज्, गुरूजी तालिम टायटन्स्, रमणबाग फायटर्स, साई पॉवर हिटर्स आणि श्रीराम पथक या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेत विजयी आगेकूच केली.

सहकारनगर येथील ल.रा. शिंदे हायस्कूल येथील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत वैभव आव्हाळे याने केलेल्या कामगिरीमुळे सुर्योदय रायझर्स संघाने कसबा कसबा सुपरकिंग्ज् चा १० गडी राखून सहज पराभव केला. सुशांत तळेकर याने फटकावलेल्या नाबाद ७३ धावांच्या जोरावर साई पॉवर हिटर्सने दगडुशेठ वॉरीयर्स संघाचा ९ गडी राखून पराभव केला. अनिल काक्केरी योन केलेल्या नाबाद १०५ धावांच्या जोरावर गजर सुपरनोव्हाज् संघाने जोगेश्वरी जॅग्वॉर्स संघाचा १०० धावांनी एकतर्फी पराभव केला आणि आगेकूच केली. निलेश एस. आणि हरनीश दानी यांनी केलेल्या फलंदाजीमुळे रंगारी रॉयल्स् संघाने युवा योद्धाज संघाचा ६२ धावांनी पराभव करून आगेकूच केली.

रोहन शेडगे याने केलेल्या नाबाद ६१ धावांमुळे गुरूजी तालिम टायटन्स् ने तुळशीबाग टस्कर्स संघाचा १० गडी राखून सहज पराभव केला. सागर पुरी याने आणि गोलंदाजांच्या अचूक कामगिरीमुळे श्रीराम पथक संघाने मंडई मास्टर्स संघाचा ३६ धावांनी पराभव केला. सत्यजीत पाळे याने केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे रमणबाग फायटर्स संघाने सुर्योदय रायझर्सचा ८ गडी राखून पराभव केला. रूपक तुबाजी याने केलेल्या अष्टपैलु खेळीमुळे शिवमुद्रा ब्लास्टर्सने जोगेश्वरी जॅग्वॉर्सचा ९ गडी राखून पराभव केला आणि आगेकूच केली. (Friendship Cup 2025-Punit Balan Group (PBG))

स्पर्धेचा सविस्तर निकालः गटसाखळी फेरीः
कसबा सुपरकिंग्ज्ः ८ षटकात ७ गडी बाद ६५ धावा (आकाश कुलकर्णी नाबाद २१, नचिकेत देशपांडे २०, अनिल वाडेकर २-१०) पराभूत वि. सुर्योदय रायझर्सः ३.१ षटकात बिनबाद ६९ धावा (गिरीष शितोळे नाबाद ३०, वैभव आव्हाळे नाबाद ३४ (९, ३ चौकार, ३ षटकार); सामनावीरः वैभव आव्हाळे;

दगडुशेठ वॉरीयर्सः ८ षटकात ६ गडी बाद ७९ धावा (कपिल राऊत ३५ (१६, ३ चौकार, ३ षटकार), अभिषेक घरमाळकर १९, प्रथमेश गोवलकर २-१०, हुमेद खान २-३) पराभूत वि. साई पॉवर हिटर्सः ४.५ षटकात १ गडी बाद ८३ धावा (सुशांत तळेकर नाबाद ७३ (२२, ७ चौकार, ७ षटकार); सामनावीरः सुशांत तळेकर;

गजर सुपरनोव्हाज्ः ८ षटकात २ गडी बाद १६६ धावा (अनिल काक्केरी नाबाद १०५ (२५, ३ चौकार, १४ षटकार), संतोष गायकवाड ४८ (२४, ३ चौकार, ४ षटकार) वि.वि. जोगेश्वरी जॅग्वॉर्सः ८ षटकात ४ गडी बाद ६६ धावा (आशिष एम. २२, समीर काळे १५, शुभम बलकवडे १-२); सामनावीरः अनिल काक्केरी;

रंगारी रॉयल्स्ः ८ षटकात २ गडी बाद १२६ धावा (हरनीश दानी नाबाद ५१ (१८, १ चौकार, ६ षटकार), निलेश एस. ४८ (१५, ३ चौकार, ५ षटकार), बापू पालंडे १-२३) वि.वि. युवा योद्धाज्ः ८ षटकात ६ गडी बाद ६४ धावा (विनायक शेडगे नाबाद ३२, सुजीत धुमाळ २-७, आकाश ठक्कर २-२३); सामनावीरः निलेश एस.;

तुळशीबाग टस्कर्सः ८ षटकात ६ गडी बाद ९३ धावा (अभिजीत वाडेकर नाबाद ५० (२३, ३ चौकार, ४ षटकार), विनोद पाटील २९, सुशील फाले ३-१३) पराभूत वि. गुरूजी तालिम टायटन्स्ः ५ षटकात बिनबाद ९४ धावा (रोहन शेडगे नाबाद ६१ (१९, ४ चौकार, ६ षटकार), भावेश सी. नाबाद ३१); सामनावीरः रोहन शेडगे;
श्रीराम पथकः ८ षटकात ६ गडी बाद १३१ धावा (शैलेश चौधरी ३९, सिद्धार्थ ढगे २६, सागर पुरी २६, ओंकार जोशी २-३२) वि.वि. मंडई मास्टर्सः ८ षटकात ४ गडी बाद ९५ धावा (अथर्व सी. ५६ (२१, १ चौकार, ७ षटकार), ओंकार जोशी २२, प्रितेश काळे २-१३); सामनावीरः सागर पुरी;

सुर्योदय रायझर्सः ८ षटकात ६ गडी बाद ९० धावा (गिरीष शितोळे ४१, अनिल राठोड १८, सत्यजीत पाळे २-२१) पराभूत वि. रमणबाग फायटर्सः ६.२ षटकात २ गडी बाद ९२ धावा (सत्यजीत पाळे नाबाद ५० (१३, २ चौकार, ६ षटकार), प्रसाद घारे १८, प्रज्योत शिरोडकर १७); सामनावीरः सत्यजीत पाळे;

जोगेश्वरी जॅग्वॉर्सः ८ षटकात ६ गडी बाद ५२ धावा (आशिष एम. नाबाद ३०, चिराग अहुजा २-८, रूपक तुबाजी २-९) पराभूत वि. शिवमुद्रा ब्लास्टर्सः ३.१ षटकात १ गडी बाद ५६ धावा (रूपक तुबाजी ३७, रोहीत खिलारे नाबाद ११); सामनावीरः रूपक तुबाजी;

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MNS On High Security Number Plate | सरकारने वाहन चालकांकडून खंडणी वसुलीसाठी वापरल्या जाणाऱ्या
‘एच डी नंबर प्लेट’ सक्तीचा फेरविचार करावा; ‘मनसे’ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Kothrud Pune Crime News | शाळेत जातो, असे सांगून 10 वर्षीय मुले घराबाहेर पडली,
घरी न परतल्याने कुटुंबीयांची धावाधाव, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

You may have missed