FSSAI Bans 111 Masala Brands | FSSAI च्या टेस्टमध्ये पास झाले दोन मोठे मसाला ब्रँड, 111 कंपन्यांचे लायसन्स रद्द, 4000 नमुन्यांची तपासणी सुरू

FSSAI Bans 111 Masala Brands

नवी दिल्ली : FSSAI Bans 111 Masala Brands | एप्रिल महिन्यात सिंगापुर आणि हाँगकाँगने अनेक उत्पादनांमध्ये कर्करोगास कारणीभूत किटकनाशक इथिलीन ऑक्साईड आढळल्यानंतर लोकप्रिय भारतीय मसाला ब्रँड एमडीएच प्रायव्हेट लिमिटेड आणि एव्हरेस्ट फूड प्रॉडक्ट्स प्रायव्हेटच्या विक्रीवर बंदी आणली होती. यानंतर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने सुरक्षा तपासणीसाठी विविध शहरातून मसाल्याचे नमूने घेतले.

नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार, मागील महिन्यात १११ मसाला उत्पादकांचे लायसन्स रद्द करण्यात आले आहे आणि त्यांना ताबडतोब उत्पादन बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

वृत्तानुसार, एफएसएसएआय देशभरात मसाल्यांच्या ४,००० पेक्षा जास्त नमुण्यांची चाचणी करत असून आणखी काही कंपन्यांच्या उत्पादनांमध्ये भेसळ समोर येऊ शकते. या नमुन्यांमध्ये एव्हरेस्ट, एमडीएच, कॅच आणि बादशाह सारखी प्रसिद्ध ब्रँडची उत्पादने समाविष्ट आहेत.

रद्द केलेल्या लायसन्सपैकी बहुतांश केरळ आणि तमिळनाडुच्या छोट्या मसाला उत्पादकांची आहेत. सोबतच गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमधील ब्रँडची सुद्धा चौकशी सुरू आहे. या १११ कंपन्यांपैकी बहुतांश छोट्या आहेत आणि त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही, कारण त्यांच्याकडे अधिकृत वेबसाईट, संपर्क नंबर अथवा ईमेल आयडी नाहीत.

एमडीएच आणि एव्हरेस्टला हिरवा झेंडा

मे महिन्यात एफएसएसाअयने एमडीएच आणि एव्हरेस्टच्या नमुन्यांची तपासणी केली
आणि त्यामध्ये ईथिलीन ऑक्साईड आढळले नाही. तपासणीत एव्हरेस्ट आणि एमडीएच मसाल्याचे ३४ नमुने होते,
ज्यापैकी ९ महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये एव्हरेस्टच्या ठिकाणांवरून आणि २५ दिल्ली.
हरियाणा आणि राजस्थानमध्ये एमडीएचच्या ठिकाणांवरून घेण्यात आले होते.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar | “माझा दोष फक्त इतकाच आहे की…” अजित पवारांनी जारी केला व्हिडिओ संदेश; जाणून घ्या

Mahavikas Aghadi | ‘आघाडी सरकार आले, तर महिलांना एक लाख’; पृथ्वीराज चव्हाणांनी केलं जाहीर

Supriya Sule On Ajit Pawar Video | अजित पवारांच्या व्हिडिओवर सुप्रिया सुळेंकडून प्रत्युत्तर; म्हणाल्या, “अजित पवारांच्या आरोपांवर…”