Gaja Marne | गजा मारणेला रिल्स बनवणं पडलं महागात; गुन्हे शाखेकडून तब्बल चार तास चौकशी (Video)

पुणे: Gaja Marne | पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे पुन्हा अडचणीत आला आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police) गजा मारणेसह आणखी एका साथीदाराची तब्बल चार तास चौकशी केली आहे. त्यानंतर त्यांना समज देऊन सोडण्यात आले आहे. आता गुन्ह्यामुळे नाही तर रिल्समुळे गजा मारणेला पोलीस स्टेशनमध्ये जावे लागले आहे. गजा मारणे त्याच्या सोशल मीडिया अकाउंटमुळे पुन्हा गोत्यात अडकला आहे. (Pune Crime Branch)
पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेला रील्स बनवणं चांगलंच महागात पडले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून गेल्या चार तासांपासून गजानन मारणेची गुन्हे शाखेच्या कार्यालयात झाडाझडती घेण्यात आली. (Gaja Marne)
गजानन मारणेच्या नावाने GM boys नावाचे इन्स्टा अकाउंट आहे. या अकाउंटवर गजानन मारणेचे साथीदार गजानन मारणेचा उल्लेख करताना डॉन, भाई अशा प्रकारे उल्लेख असलेले रील्स टाकत असतात. या रील्सचा परिणाम तरुण पिढीवर होऊन ती गुन्हेगारीकडे आकर्षित होत असल्याचे सांगत पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
गजानन मारणे हा टीपू पठाण नावाच्या साथीदाराच्या माध्यमातून इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करतो. तरुण पिढीवर या व्हिडिओचा मोठा परिणाम होत असल्याचे पोलीसांचे निरिक्षण आहे. त्यामुळे गजानन मारणेसह टीपू पठाणला देखील गुन्हे शाखेच्या कार्यालयात बोलवण्यात आले. या दोघांवरही पोलिसांची करडी नजर आहे. यापुढे अशाप्रकारचे व्हिडिओ न बनवण्याची समज पोलिसांकडून देण्यात आली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vande Bharat Express | पुण्याच्या पहिल्या ‘वंदे भारत’चे सोमवारी लोकार्पण; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
यांची माहिती, सोमवारपासून पुणे-कोल्हापूर-हुबळी फेऱ्यांना सुरुवात
Mahayuti News | ‘महायुतीत स्थानिक पातळीवर अजूनही कार्यकर्त्यांची मनं जुळलेली नाहीत’,राष्ट्रवादीच्या
बड्या नेत्याचे वक्तव्य; म्हणाले – “ज्यांच्या बरोबर संघर्ष केला…”
Ajit Pawar At Narayanpur | उपमुख्यंत्री अजित पवार यांनी नारायणपूर येथे जाऊन वाहिली;
श्रीसदगुरु नारायण महाराजांना भावपूर्ण आदरांजली