Ganesh Bidkar |  पुणे महापालिकेतील भाजपच्या गटनेतेपदी तथा सभागृह नेतेपदी गणेश बिडकर यांची नियुक्ती

Ganesh Bidkar | Ganesh Bidkar appointed as BJP group leader and leader of the house in Pune Municipal Corporation

पुणे : Ganesh Bidkar |  पुणे महापालिकेतील भाजपच्या गटनेतेपदी तथा सभागृह नेतेपदी गणेश बिडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बिडकर यांनी मावळत्या सभागृहात शेवटच्या टप्प्यात या पदावर काम केले आहे.

भाजपचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी बिडकर यांची महापालिकेतील गटनेतेपदी नियुक्ती केल्याचे पत्र दिले आहे. बिडकर हे कसबा गणपती – कमला नेहरू रुग्णालय –  के इ एम रुग्णालय प्रभागातून विजयी झाले आहेत. यापूर्वी ते चार वेळा नगरसेवक राहिले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून परिचित आहेत. 

यापूर्वी त्यांनी शहर सुधारणा समिती अध्यक्ष, स्थायी समिती अध्यक्ष, भाजप गटनेते आणि सभागृह नेते पदी काम केले आहे. नुकतेच झालेल्या निवडणुकीत भाजपने निवडणूक प्रभारी म्हणून बिडकर यांच्याकडे जबाबदारी सोपवली होती. दरम्यान २०१७ मध्ये त्यांचा पराभव झाला होता. भाजपने स्वीकृत सदस्यपदी संधी देतानाच सभागृह नेतेपदी देखील नियुक्ती केली होती.

You may have missed