Ganesh Naik News | भाजप नेते गणेश नाईक तुतारी फुंकणार की शिवसेनेची मशाल हाती घेणार? राजकीय वर्तुळात चर्चा

Ganesh Naik

मुंबई: Ganesh Naik News | आगामी विधानसभेची (Maharashtra Assembly Election 2024) घोषणा झाल्यानंतर राजकीय हालचाली वाढल्या आहेत. उमेदवारी कोणत्या पक्षातून मिळेल ती शक्यता पाहून नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. अशातच आता मुंबईतील भाजप नेते, आमदार गणेश नाईक भाजपला रामराम करण्याच्या तयारीत आहेत. (Ganesh Naik News)

गणेश नाईक यांचे नवी मुंबईसह आसपासच्या परिसरावर राजकीय वर्चस्व आहे. नवी मुंबई महानगरपालिकेतही त्यांच्या विचाराचे सर्वाधिक नगरसेवक होते. त्यामुळे गणेश नाईक यांनी पक्षांतराचा निर्णय घेतल्यास भविष्यात महापालिका निवडणुकीतही भाजपला फटका बसणार आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी गणेश नाईक यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र भाजपकडून स्वतः गणेश नाईक वगळता त्यांच्या कुटुंबातील अन्य कोणालाही विधानसभा किंवा लोकसभेचे तिकीट देण्यात आले नाही. तसेच सत्ता मिळाल्यानंतरही गणेश नाईक यांना मंत्रिपदी संधी देण्यात आली नाही.

त्यामुळे नाईक कुटुंब हे नाराज होते. त्यातच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही इच्छुक
असलेल्या संजीव नाईक यांना डावलण्यात आले.
या पार्श्वभूमीवर आता विधानसभा निवडणुकीत गणेश नाईक आपल्या स्वगृही परतू शकतात.
दरम्यान, गणेश नाईक आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी फुंकणार
की उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेची मशाल हाती घेणार,
हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Shivsena Thackeray Group)

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीत वादंग! ‘काँग्रेसमधून उमेदवार आयात करू नका’,
भाजपचा शिवसेना शिंदे गटाला इशारा

Chandrashekhar Bawankule | चंद्रशेखर बावनकुळेंकडून पुण्यातील इच्छुक उमेदवारांना समज;
म्हणाले – ‘पक्ष ज्याला उमेदवारी देईल…’

Maharashtra Assembly Election 2024 | राष्ट्रवादी-भाजपचे दोन बडे नेते शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार; फडणवीसांसह अजित पवारांना आणखी एक धक्का

Congress Leader Mohan Joshi | रेल्वे बुकिंग कालावधी कमी करण्याचा मोदी सरकारचा निर्णय एजंटसाठी की जनतेसाठी? – माजी आमदार मोहन जोशी

You may have missed