Gangadham Road Pune Crime News | पुणे: मार्केटयार्ड परिसरात बिनधास्तपणे सुरु होते हुक्का पार्लर; पोलिसांनी टाकला छापा ! भरत गावडे, दिपेंद्र खडका आणि सिद्धार्थसिंग सिंह यांना अटक
पुणे : Gangadham Road Pune Crime News | गंगाधाम रोडवरील एका हॉटेलमध्ये बिनधास्तपणे सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा घालून तिघांना अटक केली आहे. (Raid On Hookah Parlour In Pune)
भरत देवाप्पा गावडे Bharat Devappa Gavde (वय ३३, रा. शिवराय कॉलनी, अप्पर इंदिरानगर), दिपेंद्र मानबहादुुर खडका Dipendra Manbahadur Khadka (वय ३०, रा. अप्पर इंदिरानगर) आणि सिद्धार्थसिंग अशोक कुमार सिंह Siddharth Singh Ashok Kumar Singh
(वय २२, रा. शिवराय कॉलनी, अप्पर इंदिरानगर) अशी त्यांची नावे आहेत. ही कारवाई मार्केटयार्डमधील गंगाधाम रोडवरील आई माता मंदिराजवळील हॉटेल बिलयन्स लाऊन्ज (Hotel Billions Lounge) येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजता करण्यात आली.
याबाबत पोलीस हवालदार पृथ्वीराज पांडुळे यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल बिलियन्स लाऊन्ज येथे हुक्का पिण्यास दिले जात असल्याची खबर गुन्हे शाखेच्या युनिट ५ ला मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी त्याची खात्री केल्यानंतर सायंकाळी हॉटेलवर छापा घालण्यात आला.
त्यावेळी हॉटेलमध्ये हुक्का पॉट, तंबाखुजन्य अफजल, अलफकर, अलकियान हे हुक्का फ्लेवर ग्राहकांना धुम्रपानासठी अवैधरित्या विना परवाना विक्रीसाठी ठेवण्यात आलेले मिळून आले.
सहायक पोलीस निरीक्षक सिसाळ तपास करीत आहेत. (Gangadham Road Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Satish Wagh Murder Case | आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा गळा दाबून खुन;
पोलीस उपायुक्त आर राजा यांनी सांगितली हकीकत