Gaurav Ahuja Arrested | पुणे : रस्त्यात लघुशंका करणार्‍या गौरव अहुजा याला येरवडा पोलिसांनी केली अटक (Video)

Gaurav Ahuja Arrested

पुणे : Gaurav Ahuja Arrested | येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात भर रस्त्यावर लघुशंका करणार्‍या गौरव मनोज अहुजा (Gaurav Manoj Ahuja) याला येरवडा पोलिसांनी कराड पोलिसांच्या (Karad Police) ताब्यातून पुण्यात आणून रविवारी सकाळी अटक केली. (Pune Police)

गौरव मनोज आहुजा (वय २५, रा. एन आय बीएम रोड, कोंढवा) आणि त्याचा साथीदार भाग्येश प्रकाश ओसवाल Bhagyesh Prakash Oswal (वय २२, रा. मार्केटयार्ड) अशी या दोघांची नावे आहेत.

https://www.instagram.com/p/DG91vb4psC1

येरवडा परिसरातील शास्त्रीनगर चौकात बीएम डब्ल्यु कारमधून (BMW Car) हे दोघे सकाळी सात वाजता येतात. चौकात सिग्नल लागलेला असतो. अचानक या बीएमडब्ल्युमधून एक तरुण उतरतो. भर चौकातील दुभाजकावर तो लघुशंका करतो. हे पाहून तेथून जाणारा एक नागरिक त्याचा व्हिडिओ काढतो. त्याला विचारणा करतो, तेव्हा तो त्याच्याशी आरे रावी करत वेगाने गाडी घेऊन निघून जातो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर काही वेळातच व्हायरल होतो. सर्व वृत्तवाहिन्या, वेबसाईटवर शनिवारच्या सकाळी हाच व्हिडिओ व्हायरल होत होता. लघुशंका करणारा तरुण म्हणजे गौरव आहुजा असल्याचे स्पष्ट होते. त्याच्याबरोबर गाडीत असलेला भाग्येश प्रकाश ओसवाल हा असल्याचे निष्पन्न होते. पोलीस गौरवचे वडिल मनोज आहुजा यांना पोलीस ठाण्यात घेऊन येतात. त्यांची चौकशी सुरु करतात. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता येरवडा पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जातो. भाग्येश प्रकाश ओसवाल याला ताब्यात घेतले जाते. त्याची वैद्यकीय तपासणी केल्यावर त्याला रात्री ११ वाजता अटक केली जाते.

दरम्यान, पळून गेलेला गौरव आहुजा याचा शोध सुरु असतो. तो एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून पुणेकरांची माफी मागतो. त्यानंतर तो रात्री कराड पोलिसांच्या स्वाधीन होतो. ही माहिती समजताच येरवडा पोलीस ठाण्याचे एक पथक कराडला रवाना होते. येरवडा पोलीस त्याला ताब्यात घेतात. त्याला पुण्यात आणून वैद्यकीय तपासणी करुन रविवारी सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी अटक केली जाते.

येरवडा येथील शास्त्रीनगर चौकात गौरव आहुजा याने शनिवारी सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी हे घृणास्पद कृत्य केले होते. त्यानंतर तब्बल २४ तासांनी त्याला रविवारी सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी अटक केली गेली. त्यामुळे त्यांची वैद्यकीय चाचणी करुन त्यातून तो दारुच्या अंमलाखाली होता, हे या चाचणीतून येण्याची शक्यता खूपच कमी आहे. (Gaurav Ahuja Arrested)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MNS On High Security Number Plate | सरकारने वाहन चालकांकडून खंडणी वसुलीसाठी वापरल्या जाणाऱ्या
‘एच डी नंबर प्लेट’ सक्तीचा फेरविचार करावा; ‘मनसे’ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Kothrud Pune Crime News | शाळेत जातो, असे सांगून 10 वर्षीय मुले घराबाहेर पडली,
घरी न परतल्याने कुटुंबीयांची धावाधाव, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

You may have missed