Gautam Gambhir | गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक, जय शाहांची घोषणा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gautam Gambhir | राहुल द्रविड यांच्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षकपद कोण सांभाळणार याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलं होतं. अखेर याची प्रतिक्षा संपली असून, माजी क्रिकेटपटू आणि 2007 आणि 2011 च्या टीम इंडियाच्या विश्वविजेतेपदांमध्ये मोलाची भूमिका बजावणारा फलंदाज गौतम गंभीर याची भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गौतम गंभीर यांच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्तीची आज (मंगळवार) औपचारिक घोषणा केली. भारतीय संघाने टी-20 विश्वचषकाचं विजेतेपद पटकावल्यानंतर राहुल द्रविड हे भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाच्या जबाबदारीतून सन्मानाने मुक्त झाले होते. (Gautam Gambhir)
जय शाह यांनी एक्स वर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटले की,
‘मला गौतम गंभीरला भारतीय क्रिकेट टीमचा नवा मुख्य कोच म्हणून स्वागत करताना अत्यंत आनंद होत आहे.
आधुनिक क्रिकेट वेगानं विकसित होत आहे. गौतमनं हे बदलतं चित्र जवळून पाहिलंय.
त्यानं संपूर्ण कारकिर्दीमध्ये वेगवेगळ्या भूमिकेत सर्वोत्तम प्रदर्शन केलंय.
भारतीय क्रिकेटला पुढं नेण्यासाठी गौतम गंभीर योग्य व्यक्ती आहे, असा मला विश्वास आहे.’
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Tomato Price Hike | वेगाने वाढला टोमॅटोचा दर, 100 रुपये किलोवर पोहोचला, जाणून घ्या कधी होणार स्वस्त?