GBS In Pune | पुण्यात जीबीएस आजाराचा विळखा वाढतोय, 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर, एकाचा मृत्यू ; कोणत्या भागात किती रुग्ण? जाणून घ्या

Guillain-Barre Syndrome

पुणे : GBS In Pune | गुईलेन बॅरो सिंड्रोम Guillain-Barre Syndrome (GBS) या आजाराचे रुग्ण पुण्यात वाढताना दिसत आहेत. शनिवार (दि.२५) २४ जण व्हेंटिलेटर असल्याची माहिती मिळाली होती. त्यातील १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आता १४ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. अशातच आता पुण्यातील कोणत्या भागातून किती रुग्ण आहेत याची आकडेवारी समोर आली आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावर रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे.

(दि.२५) गुईलेन बॅरे रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झाली होती. रुग्णांचा आकडा ७३ वर पोहोचला होता. जीबीएसच्या वाढत्या रुग्णांची दखल घेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सेंट्रल सर्व्हेलन्स युनिटने दखल घेतली आहे. स्थानिक प्रशासनाच्या मदतीसाठी हे युनिट पुण्यात पाठवण्यात आले आहे. अशातच पुणेकरांना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. शनिवार (दि.२५) एकही रूग्ण सापडला नसून, १० रुग्ण बरे झाले असून, १४ जण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती समोर आली आहे.

कुठल्या भागात किती रुग्ण:

पुणे शहर:
बाजीराव रस्ता- १ , पर्वती दर्शन- १, माणिक बाग- सिंहगड रस्ता- ४, दांडेकर पूल- १, धायरी- ३, संतोषनगर-कात्रज- १

पुणे ग्रामीण:
किरकटवाडी- १४, नांदेड सिटी- ७, कोळेवाडी- १, खडकवासला- १, नांदेड फाटा- २, आंबेगाव- १, डीएसके विश्व- ८, नांदेड गाव- ४, वाघोली- १

पिंपरी चिंचवड:
संत तुकाराम नगर-१, थेरगाव-२, पिंपरी-१, इंद्रायणी नगर – भोसरी- ३, पिंपळे गुरव- २, चिखली- १, केळगाव केढ- १, चिंचवड- १, पत्ता नसलेले- ३

दरम्यान पुण्यातील जीबीएस बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मूळचा सोलापूर जिल्ह्यातील असणारा तरुण पुण्यातील धायरी परिसरातील डीएसके विश्व या ठिकाणी वास्तव्यास होता. काही दिवसांपूर्वीच या तरुणाला पुण्यात जीबीएस रूग्णाची लागण झाली होती. तब्येत खालवल्याने त्याला सोलापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी अतिदक्षता विभागातून त्याला डिस्चार्च देण्यात आला होता. परंतु परत श्वसनाचा त्रास झाल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (GBS In Pune)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Hindu Garjana Chasak 2025 | हिंदू गर्जना चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा लोगोचे युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते अनावरण;
दि. 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान रंगणार आखाडा (Video)

Pune Metro News | पुणेकरांसाठी गुड न्यूज! ‘या’ मेट्रो मार्गास केंद्र सरकारचा हिरवा कंदील,
वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न

You may have missed