Girish Mahajan On Harshvardhan Patil | ‘देवेंद्र फडणवीस स्वतः हर्षवर्धन पाटलांच्या संपर्कात’, पक्षांतराच्या चर्चेवर गिरीश महाजनांचे वक्तव्य; म्हणाले – “मतदारसंघाबाबतच्या नक्कीच काही अडचणी, मात्र…”

मुंबई : Girish Mahajan On Harshvardhan Patil | भाजपा नेते हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात (Sharad Pawar) प्रवेश करून हाती तुतारी (Tutari) घेतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्याबाबत बोलताना पाटील यांनीही तसे संकेत दिले होते. भाजपाला हर्षवर्धन पाटील यांच्या रुपाने मोठा फटका बसण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांच्याबाबतच्या चर्चांवर भाजपाचे नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
मंत्री गिरीश महाजन यांच्या मुंबईतील घरी आज गणरायाचे आगमन झाले. यावेळी हर्षवर्धन पाटीलही उपस्थित होते. माध्यमांशी बोलताना महाजन म्हणाले, ” हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेत आहेत या सगळ्या अफवा आहेत. एका साखर कारखान्याच्या बैठकीच्या संदर्भात ते पुण्याला एकत्र आले होते.
त्यांच्यावर केंद्राची सहकार खात्यासंदर्भातली साखर कारखान्यांची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना जाणं अपरिहार्य होतं. ते एका ठिकाणी भेटून बोलले याचा अर्थ ते तिकडे चालले असं समजण्याचं कारण नाही”, असे त्यांनी म्हंटले.
ते पुढे म्हणाले, “अनेक कार्यक्रमांमध्ये आम्ही नेते एकमेकांना भेटत असतो.
पण याचा अर्थ असा नाही की आम्ही तुतारी हाती घेतली किंवा मशाल हाती घेतली.
हर्षवर्धन पाटील आमच्यासोबतच आहेत. त्यांच्या मतदारसंघाबाबतच्या नक्कीच काही अडचणी आहेत.
पण त्या सोडवल्या जातील. देवेंद्र फडणवीस स्वत: त्यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्याशी बोलत आहेत.
हर्षवर्धन पाटील माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. त्यामुळे मला वाटतं की या सगळ्या अफवा आहेत.”
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा