Girish Mahajan On Vidhan Sabha Election 2024 | देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ! येत्या 15 ते 20 दिवसात आचारसंहिता लागणार; गिरीश महाजन यांनी सांगितले

ऑनलाइन टीम – Girish Mahajan On Vidhan Sabha Election 2024 | विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) तोंडावर असून आता आचार संहिता कधी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यातच राज्याचे ग्रामविकास मंत्री व नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी येत्या 15 ते 20 दिवसात आचारसंहिता लागणार अशी माहिती दिली आहे. तसेच भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) असतील असे ही त्यांनी सांगितले.
नांदेडमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शासकीय ध्वजरोहण करण्यात आले. शिवाय हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून महाजन यांनी स्मारकास अभिवादन देखील केले.
राज्यात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार याविषयी सुरू असलेल्या चर्चेवर भाष्य करताना ते म्हणाले की, भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देवेंद्र फडणवीस असतील. या बाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील पण, भाजपचा मुख्यमंत्री असेल तर आमच्या मनातला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असतील असं महाजन म्हणाले.
एका जागेवर दहा दहा जणांचा दावा
महाजन म्हणाले की, एका जागेवर दहा दहा जण दावा करत आहेत. उमेदवारी बाबत शेवटी पक्षश्रेष्ठी ठरवेल, पण राज्यात महायुती एकत्रपणे निवडणूक लढणार आहे. आणि राज्यात महायुतीचे सरकार येईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
आठवडाभरात पूर्ण होतील पंचनामे
नांदेड जिल्ह्याला सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता.या परिस्थितीत प्रशासनाच्या वतीने व्यापक प्रमाणात पंचनामे सुरू केले आहेत. आठवडाभरात पंचनामे पूर्ण होतील. पंचनाम्यानंतर शेतीच्या नुकसानाची मदत विनाविलंब शेतकऱ्यांना देण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री महाजन यांनी दिली. (Girish Mahajan On Vidhan Sabha Election 2024)
नांदेड जिल्हयातील शेतकर्यांना 446 कोटी रूपये वाटप
राज्य शासनाने नुकसान भरपाई देण्यासाठी कधीही वेळ लावला नाही.
समस्या, आपत्ती, संकट कोणतेही असू दे. तातडीची मदत आणि मानवी संवेदना जोपासून सहाय्य केले आहे.
तसेच सन २०२३ मध्ये झालेल्या नुकसानापोटी एकट्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४४६ कोटी रुपये वाटप
यापूर्वी करण्यात आले आहे असेही त्यांनी सांगितले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा