Gold Market News | ‘टॅरिफ धोरणा’च्या निर्णयाची झळ भारताच्या सोन्याच्या दरावर; सोने पुन्हा 700 रुपयांनी महागले

Gold (1)

जळगाव : Gold Market News | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांच्या टॅरिफ धोरणाच्या निर्णयाचा परिणाम आता भारतातील सोन्याच्या किमतीवरही झाला आहे. ९३ हजारांच्या घरात गेलेल्या सोन्याचा भाव मध्यरात्रीतून ७०० रुपयांनी वाढून थेट ९४,७०० रुपयांवर जाऊन पोहोचले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धारेणाच्या निर्णयामुळे ही वाढ झाल्याची चर्चा आहे. काही दिवसात सोन्याचा भाव ९५,०००-९७ हजारांवर पोहोचू शकतात, असा अंदाज जळगावच्या सोने व्यवसायिकांकडून वर्तवला जात आहे. सोन्याच्या वाढत्या दरात ग्राहक वेट ॲन्ड वॉचच्या भूमिकेत असल्याचे पाहायला मिळते. सोन्याचे दर आवाक्याबाहेर जात असल्याने ग्राहकही सध्या सोने खरेदीसाठी हात आखडता घेत आहेत. (Gold Rate)

एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात सोन्याचा दर ९३ हजार ५०० रुपये प्रति तोळा, तर चांदीचा दर १ लाख २ हजारांवर पोहचला आहे. जागतिक स्तरावर झालेली अनिश्चितता तसेच, अमेरिकेचे टॅरिफ धोरण वाढत्या सोन्याच्या दरांना कारणीभूत असल्याचे बाफना ज्वेलर्सचे संचालक सुनील बाफना यांनी सांगितले.

दर आवाक्याबाहेर जात असल्याने ग्राहकांचे अर्थकारण बिघडत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या काही धोरणांचा थेट सोन्याच्या दरावर परिणाम होत आहे. सोन्याचा भाव वाढत असला, तरीदेखील सोन्याकडे एक शाश्वत गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहिले जाते. परिणामी ग्राहकांकडून सोन्याची विक्री कुठेही कमी झाली नाही. मात्र, सर्वसामान्यांकडून वाढत्या सोन्याच्या दरवाढीवर चिंताजनक प्रतिक्रिया येत आहेत.

लग्नाच्या हंगामात जळगावला जाऊनही बरेच लोक सोने खरेदी करतात. मुलीच्या लग्नासाठी, मुलाच्या लग्नासाठी किंवा चांगला गुंतवणूक पर्याय म्हणून सोने सतत खरेदी केले जाते. विशेषतः गरीब कुटुंबातील लोक पैसे आणि मंगळसूत्र खरेदी करण्यासाठी देखील सोने खरेदी करतात. तथापि, ग्राहकांचे म्हणणे आहे की, हे सोने आता त्यांच्या खिशाला परवडणारे नाही.

You may have missed