Gold Price Today | आर्थिक मंदीत सोने खरेदीची सुवर्णसंधी! भावात १,१०० रुपयांची घसरण; चांदीही घसरली
मुंबई : Gold Price Today | अमेरिकेतील आर्थिक मंदीच्या धास्तीने सोने-चांदीचे भावही घसरले आहेत. दिल्लीमध्ये सोन्याच्या भावात ११०० रुपये घसरण झाली आहे, तर चांदी २२०० रुपयांनी उतरली आहे. सराफांकडून घटलेल्या मागणीमुळे ही घसरण झाल्याचे सांगितले जात आहे.
दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रतितोळा ७१,७०० रुपये नोंदवले गेले. तर चांदी ८२ हजार रुपये प्रति किलोपर्यंत खाली आली आहे. सलग चौथ्या सत्रात चांदीच्या भावात घसरण झाली आहे, अशी माहिती ऑल इंडिया सराफा असोसिएशनने दिली. चार दिवसांत ४,२०० रुपयांनी चांदी स्वस्त झाली आहे.
९९.५ टक्के शुद्ध सोन्याच्या भावात १,१०० रुपयांची घट झाली आहे. आज या सोन्याचा भाव प्रतितोळा ७१,३५० रुपये नोंदला गेला. सराफा व्यावसायिक आणि किरकोळ ग्राहकांकडून मागणी घटल्यामुळे सोन्याचे भाव घसरल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय बाजारातील कॉमिक्समध्ये सोन्याचे भाव २० अमेरिकन डॉलर्सने घसरले असून २० अमेरिकन डॉलरने घसरले असून २,४०९ डॉलर प्रतिऔंस भाव नोंदला गेला. सोन्याच्या किमतीत सोमवारी एक टक्क्यापेक्षा जास्त घसरण झाली.
जागतिक बाजारातील मंदी, आर्थिक चिंतेतील वाढ आणि येनमधील मंदावलेला व्यापार याची सोन्यालाही झळ बसत आहे. मात्र भू- राजकीय तणाव आणि व्याजदर कपातीच्या शक्यतेने सोन्याच्या किमतींना आधार मिळत आहे.
बहुतांश शहरांमध्ये सोन्याचे भाव १,००० रुपयांनी कमी झाले आहेत.
मुंबई, पुणे आणि कोलकाता येथे २४ कॅरेट सोन्याचा भाव ६९,७०० प्रति १० ग्रॅम आहे.
सराफ व्यावसायिक नितीन अग्रवाल यांनी सांगितले की , ऑगस्ट महिन्यात सराफा बाजारात सर्वात मोठी घसरण झाली आहे.
सोने-चांदी खरेदीसाठी हा काळ चांगला आहे. ऑगस्टच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली होती.
सोन्याचे दागिने खरेदी करत असताना सोन्याच्या शुद्धतेकडे कधीही दुर्लक्ष करू नये.
हॉलमार्क पाहिल्यानंतरच दागिने खरेदी करा. ही सोन्याची सरकारी हमी असते.
ब्युरो ऑफ इंडियन स्टॅन्डर्स (BIS) ही भारतातील एकमेव एजन्सी हॉलमार्क ठरवते.
सर्व कॅरेटचे हॉलमार्क नंबर वेगवेगळे असतात.
ते पाहिल्यानंतर आणि समजून घेतल्या नंतरच सोने खरेदी करणे महत्वाचे आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sinhagad Road Pune Flood | डोळ्यांदेखत बुडाला संसार; सिंहगड रस्त्यावरील पुरात कुटुंबाचे नुकसान
Pune Crime News | गटारीला जेवायला घालून कोयत्याने डोक्यात वार करुन केले गंभीर जखमी
Murder Due To Immoral Relationship | अनैतिक संबंधाच्या संशयावरून गुप्तीने भोसकून तरुणाचा खून