Gold Prices | घसरत आहेत सोन्याचे दर, दागिने खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत, तर ‘या’ सरकारी गोल्ड स्कीममध्ये करा गुंतवणूक, रिटर्नसह व्याजसुद्धा

Gold

नवी दिल्ली : Gold Prices | अर्थसंकल्पात सोने-चांदीवर कस्टम ड्यूटी कमी केल्याने सोन्याचा दर वेगाने खाली येताना दिसत आहे. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 70,000 च्या खाली गेला आहे. अशावेळी लग्नसोहळ्यासाठी लोक सोने खरेदी करत आहेत. मात्र, सोन्याचे दागिने खरेदी करण्याऐवजी सरकारी सॉव्हरेन गोल्ड बाँड योजनेत पैसे गुंतवू शकता. या योजनेत दर वाढल्यानंतर रिटर्नसह दरवर्षी व्याजसुद्धा मिळेल.

सरकार सॉव्हरेन गोल्ड बाँड योजना बंद करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, सोन्याच्या दरात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर या योजनेत पैसे लावल्यास मोठा लाभ होऊ शकतो. या योजनेत तुम्ही 1 ग्रॅम सोनेसुद्धा खरेदी करू शकता.

गोल्ड बाँड स्कीममध्ये गुंतवणुकीवर रिटर्नसह वार्षिक व्याज 2.5% व्याजसुद्धा मिळते. व्याजाची रक्कम दर सहा महिन्यांनी तुमच्या खात्यात टाकली जाते. तसेच सोन्याचा भाव वाढल्यास वेगळा रिटर्न सुद्धा मिळतो. (Gold Prices)

सॉव्हरेन गोल्ड बाँड ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने खरेदी करता येतात. बँक अथवा पोस्टऑफिसमध्ये जाऊन फॉर्म भरून सहजपणे गोल्ड बाँड खरेदी करू शकता. तसेच सॉव्हरेन गोल्ड बाँड नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग अथवा डिमॅट खात्याद्वारे सुद्धा खरेदी करू शकता.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Water Storage In Pune Dam | पुणेकरांसाठी गुड न्यूज ! पाण्याचं टेन्शन मिटलं; कोणत्या धरणात किती पाणीसाठा? जाणून घ्या

Pune Crime News | नवीन मोटारसायकलची राईड बेतली जीवावर ! पाण्याच्या टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यु

Sharad Pawar | शरद पवारांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – ‘महाराष्ट्रातही मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण झाली असती पण…’

You may have missed