Gold-Silver Price | सोने-चांदीच्या किमतीत घसरण, जाणून घ्या आज किती रुपये स्वस्त झाले गोल्ड-सिल्व्हर

Gold

मुंबई : Gold-Silver Price | सोने-चांदीच्या भावात आज मंगळवारी, 30 जुलै 2024 ला थोडी घसरण नोंदली गेली आहे. मंगळवारी बाजार उघडताच सोन्याच्या दरात 87 रुपयांची घसरण दिसून आली. तर, चांदीच्या दरात सुद्धा 576 रुपयांची घसरण झाली. सोने-चांदीचा दर काय आहे, ते जाणून घेऊया…

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, आज 24 कॅरेट गोल्डचा दर 68713 प्रति दहा ग्रॅम आहे. सोमवारचा विचार केला तर सोने 68800 रुपयांवर बंद झाले होते. चांदीच्या दरात सुद्धा आज घसरण दिसून आली. चांदीच्या दरात आज 576 रुपयांची घसरण झाली.

999 शुद्धतेच्या एक किलोग्रॅम चांदीचा दर 81616 रुपये आहे. सोमवारी मार्केट बंद होईपर्यंत चांदीचा दर 82192 होता. तर, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याबाबत बोलायचे तर त्याचा दर 62941 आहे.
अशाप्रकारे शुद्धतेच्या आधारावर सोने आणि चांदीचे दर घसरले आहेत.

अधिकृत वेबसाईट ibjarates . com नुसार, आज 995 (23 कॅरेट) शुद्धतेच्या सोन्याचा दर 68438 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
तर, 916 (22 कॅरेट) शुद्धतेच्या सोन्याचा दर 62941 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 750 (18 कॅरेट) शुद्धतेच्या सोन्याचा दर 51535 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर, 585 (14 कॅरेट) शुद्धतेच्या सोन्याचा दर 40197 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Yashshree Shinde Murder Case | यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला कर्नाटकातून अटक

BJP MLA Siddharth Shirole | भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार

Swikruti Pradeep Sharma Join Shivsena | एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नीची राजकारणात ‘एन्ट्री’;
शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश

Leopard In Malthan Pune | पुणे: मलठण येथे बिबट्या जेरबंद

You may have missed