Gold-Silver Price Today | सोन्या-चांदीच्या बाजारात मोठा फेरबदल; आजचा भाव काय? जाणून घ्या
मुंबई : Gold-Silver Price Today | सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठे चढ-उतार पाहायला मिळत असून, गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही मौल्यवान धातूंनी जोरदार उसळी घेतल्यानंतर मंगळवारी बाजार उघडताच नफा वसुली झाली आणि दरांमध्ये घसरण नोंदवली गेली.
सोमवारी सोन्याच्या किमतीत सुमारे २,७९८ रुपयांची वाढ झाली होती, तर चांदीने तब्बल ८,७३६ रुपयांहून अधिक उसळी घेतली होती. मात्र १० फेब्रुवारी रोजी एमसीएक्स बाजार सुरू होताच एप्रिल सोन्याचा वायदा दर सुमारे १.५६ लाख रुपये प्रति १० ग्रॅमच्या आसपास व्यवहार करत होता, तर मार्च चांदीचा वायदा दर सुमारे २.५९ लाख रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला.
मुंबईतील सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी १,५७,९२० रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव १,४४,७६० रुपये असून १८ कॅरेट सोनं १,१८,४५० रुपयांवर व्यवहार करत आहे. दरातील या चढ-उतारामागे डॉलर निर्देशांकातील हालचाल, जागतिक भू-राजकीय घडामोडी आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेशी संबंधित संकेत हे महत्त्वाचे घटक ठरत आहेत. व्याजदर कपातीच्या अपेक्षांमुळेही बाजारात हालचाली वाढल्या असून, त्यामुळे सोन्या-चांदीत अल्पकालीन अस्थिरता कायम राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
