Gold-Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी उलथापालथ; आजचा भाव काय?
पुणे : Gold-Silver Price Today | सराफा बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती वाढत आहेत. सोन्याच्या किमतींमधील या सततच्या वाढीमुळे ग्राहकांच्या खिशावर मोठा ताण येत आहे. तथापि, आज, 31 जानेवारी 2026 रोजी, भारतीय बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये एक मोठा बदल दिसून आला. सोन्याच्या किमती कमी झाल्या असून, चांदीच्या किमतींमध्येही बदल दिसून आला आहे.
गेल्या वर्षी पासून सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना सोने खरेदी करण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा लागणार आहे. आज सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याचा आजचा 31 जानेवारीचा 10 ग्रॅमचा भाव 1 लाख 69 हजार 200 आहे तर तर चांदीचे दर 4 लाख 5 हजार रुपये प्रती किलो आहे.
– सोने 10 ग्रॅमचा भाव – 1 लाख 69 हजार 200 रुपये
– चांदी 1 किलो भाव – 4 लाख 5 हजार रुपये
