Gold-Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा बदल; मुंबई-पुण्यातील आजचा 10 ग्रॅमचा भाव काय? जाणून घ्या

Gold (1)

पुणे ः पोलीसनामा ऑनलाईन – Gold-Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सोन्याच्या किमतीत सतत वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. त्याचप्रमाणे आज, मंगळवार, ४ नोव्हेंबर २०२५ रोजी भारतीय बाजारात सोन्याच्या किमतीत मोठा बदल झाला आहे. सोन्याच्या किमतीत घसरण झाली असली तरी चांदीच्या किमतीतही बदल झाला आहे.

बुलियन मार्केट वेबसाइटनुसार, आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १२१,२५० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १११,१४६ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर १४७,६०० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,४७६ रुपये आहे.

आजचा सोन्याचा भाव –

मुंबई ः
२२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,१०,९४४
२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,२१,०३०

पुणे ः
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,१०,९४४
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,२१,०३०

नागपूर ः
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,१०,९४४
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,२१,०३०

नाशिक ः
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,१०,९४४
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,२१,०३०

You may have missed