Gold-Silver Price Today | सोन्याची एक लाखाच्या दिशेने वाटचाल, चांदीही महागली; मुंबई-पुण्यातील 10 ग्रॅमचा भाव किती? जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Gold-Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत सातत्याने बदल होताना दिसत आहे. अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर सोन्याच्या किमतीत झळाळी पाहायला मिळण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आला होता. तो अंदाज खरा ठरताना दिसत आहे. मंगळवारी (२२ एप्रिल) सोन्या-चांदीच्या भावात वाढ झाली आहे.
बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, मंगळवारी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ९९,१४० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा भाव ९०,८७८ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा भाव ९६,३१० रुपये आहे. तसेच, १० ग्रॅम चांदीचा भाव ९६३ रुपये आहे.
दरम्यान, हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे, हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते. सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे. १ एप्रिल २०२३ पासून केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.
आजचा सोन्याचा भाव काय?
मुंबई :
२२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९०,७१३
२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९८,९६०
पुणे :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९०,७१३
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९८,९६०
नागपूर :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९०,७१३
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९८,९६०
नाशिक :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९०,७१३
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९८,९६०