Gold-Silver Price Today | मकर संक्रांतीच्या दिवशी सोन्याच्या दरात उलथापालथ; पुणे-मुंबईतील भाव काय?  

Gold

पुणे :  Gold-Silver Price Today | सराफा बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सोन्याच्या दरातील या सततच्या वाढीमुळे ग्राहकांच्या खिशावर मोठा ताण येत आहे. याच दरम्यान, मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर आज सोन्याच्या बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. बुधवार, १४ जानेवारी २०२६ रोजी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली, तर चांदीच्या दरातही बदल दिसून आले.

बुलियन मार्केट वेबसाइटनुसार, आज देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १४२,७१० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा दर १३०,८१८ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा दर २७४,७७० रुपये आहे. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर २,७४८ रुपये आहे.  

आजचा सोन्याचा भाव –  

मुंबई :
२२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,३०,५७९
२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४२,४५०

पुणे :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३०,५७९
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४२,४५०

नागपूर :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३०,५७९
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४२,४५०

नाशिक :
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३०,५७९
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४२,४५०

You may have missed