Gold-Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किमतीत किंचित घट; मुंबई-पुण्यातील 10 ग्रॅमचा भाव किती? जाणून घ्या

Gold (1)

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Gold-Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सराफा बाजारात सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सोन्याच्या किमतीत सतत वाढ होत असल्याने लग्नसराईच्या काळात ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसत होता. त्याचप्रमाणे बुधवारी (२३ एप्रिल) सोन्याच्या किमतीत थोडीशी घट दिसून आली आहे. तर चांदीच्या किमतीतही बदल झाला आहे.

बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, बुधवारी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ९६,१६० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा भाव ८८,१४७ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा भाव ९६,०५० रुपये आहे. तसेच, १० ग्रॅम चांदीचा भाव ९६१ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

दरम्यान, हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे, हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते. सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे. १ एप्रिल २०२३ पासून केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.

आजचा सोन्याचा भाव काय?

मुंबई ः
२२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ८७,९९१
२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९५,९९०

पुणे ः
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८७,९९१
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९५,९९०

नागपूर ः
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८७,९९१
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९५,९९०

नाशिक ः
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८७,९९१
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९५,९९०

You may have missed