Gold-Silver Price Today | सोन्या-चांदीच्या किमतीत किंचित वाढ; तुमच्या शहरातील भाव काय? जाणून घ्या

पुणे : Gold-Silver Price Today | सोने आणि चांदीच्या किमतीत सतत चढ-उतार होत असतात. कधी सोन्याची किंमत वाढते तर कधी कमी होते. गुरुवारी (९ एप्रिल) सोन्याच्या किमतीत पुन्हा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. चांदीच्या किमतीतही बदल झाला आहे. तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचा भाव काय, जाणून घ्या.
बुलियन मार्केट वेबसाइटनुसार (Bullion Market Website) गुरुवारी देशात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ८९,८३० रुपये आहे. तर २२ कॅरेटसाठी १० ग्रॅम सोन्याचा भाव ८२,३४४ रुपये आहे. तर १ किलो चांदीचा भाव ९१,९४० रुपये आहे. तसेच, १० ग्रॅम चांदीचा भाव ९१९ रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
दरम्यान, हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे, हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते. सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे. १ एप्रिल २०२३ पासून केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.
सोन्याचा भाव काय?
मुंबई ः
२२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ८२,१९८
२४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ८९,६७०
पुणे ः
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८२,१९८
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८९,६७०
नागपूर ः
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८२,१९८
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८९,६७०
नाशिक ः
२२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८२,१९८
२४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ८९,६७०