Gold-Silver Rate | एका आठवड्यात किती बदलला सोन्याचा दर? महिनाभरात रु. 4000 पर्यंत घसरली 10 ग्रॅमची किंमत
नवी दिल्ली : Gold-Silver Rate | सोन्याच्या किमतीत मागील दोन महिन्यात मोठा चढ-उतार दिसून आला, कधी वेगाने किंमत विक्रमी स्तरावर गेली तर केंद्रीय अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील कस्टम ड्युटीत कपातीची घोषणा केल्यानंतर दर जबरदस्त घसरला. मागील आठवड्यात तर सोने महाग झाले आहे आणि 71,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेले आहे. मात्र, सोने आपल्या ऑल टाइम हायपासून अजूनही 4000 रुपयांनी स्वस्त आहे. (Gold-Silver Rate)
मल्टी कमोडिटी एक्सचेंजचे आकडे पाहिल्यास, आठवडाभरात सोन्याचा भाव वाढला आहे. शनिवार आणि रविवारी कमोडिटी मार्केटमध्ये क्लोजिंग असल्याने एमसीएक्सवर मागील 16 ऑगस्टचा दर पाहिला तर तो घसरून 70,279 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचला होता.
परंतु कमोडिटी मार्केटमध्ये व्यवहार बंद होता-होता यामध्ये अचानक उसळी दिसून आली आणि ते 71,395 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचून बंद झाले होते. मागील आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचा दर 70,738 रुपये होता, अशावेळी आठवड्याच्या पाच व्यवहाराच्या दिवसात 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 657 रुपयांची वाढ नोंदली गेली आहे.
महिनाभरातील दराविषयी बोलायचे तर, 18 जुलैपासून 18 ऑगस्ट रविवार पर्यंत सोन्याचा दर 4000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या जवळपास कमी आहे. एमसीएक्सवर 4 ऑक्टोबर 2024 च्या अखेरसाठी सोन्याचा दर बरोबर एक महिन्यापूर्वी 18 जुलैला 74,638 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. या हिशोबाने पाहिले तर महिनाभरानंतर अजूनही सोने आपल्या हाय लेव्हलपासून खुप स्वस्त मिळत आहे.
23 जुलैला अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सोन्याचा दर घसरला होता आणि ते 67,000 रुपयांच्या जवळ पोहचले होते, परंतु ऑगस्ट महिन्यात त्याच्या किंमतीने पुन्हा उसळी घेतली आहे.
चांदीची स्थिती काय आहे?
आठवडाभरात चांदीच्या दरात उसळी दिसून आली आहे.
16 ऑगस्ट एमसीएक्सवर चांदीचा दर 83,256 रुपये प्रति किलोवर पोहोचला.
तर मागील 12 ऑगस्टला ती 81,624 रुपये प्रति किलोग्रॅमवर होती.
म्हणजे चांदीच्या दरात आठवड्यात 1632 रुपये प्रति किलोची वाढ झाली आहे.
महिन्यापूर्वी 18 जुलैला चांदीचा दर 91,772 रुपये प्रति किलोग्रॅम होता, ज्याच्या तुलनेत चांदी अजूनही स्वस्त आहे.
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Supriya Sule On Ajit Pawar | “मी भावासोबत गेले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, पण…”,
अजित पवारांच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंचे वक्तव्य