Gold Silver Rate In Diwali | दिवाळीसाठी बाजारपेठ सज्ज ! सोन्याचे दर चढे असूनही खरेदीत वाढ, बाजारात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होण्याचा अंदाज
पुणे: Gold Silver Rate In Diwali | दिवाळीनिमित्त सोन्याचे दागिने, चांदी, कपडे, दुचाकी, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे. दिवाळीसाठी बाजारपेठ सज्ज झाली असून, व्यापाऱ्यांनीसुद्धा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध सवलती दिल्या आहेत. त्यामुळे दिवाळीच्या काळात बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांत सोन्याचे भाव चढे राहिले आहेत. तरीही ग्राहकांकडून खरेदी वाढत आहे. दिवाळीमुळे खरेदी आणखी वाढणार आहे. दिवाळीनंतर लग्न सराईचे दिवस येतात. त्यासाठीही सोने- चांदीसह इतर दागिन्यांची खरेदी वाढते.
भाव काही कमी न झाल्याने काही सोने खरेदीदारांची थोडी निराशा झाली. आगामी काळात सोन्याचा भाव आणखी वाढण्याची शक्यता असल्याने दागिन्यांची खरेदी कायम आहे.
याशिवाय गुंतवणुकीच्या उद्देशानेही सोन्याची खरेदी होत आहे. नियमित गुंतवणूकदारांकडून येत्या काळातही खरेदी कायम राहण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या पार्श्वभूमीवर इस्त्रायल व पॅलेस्टाइन यांच्यातील युद्धामुळे निर्माण झालेल्या स्थितीनंतरही सोन्याच्या भावातील तेजी कायम राहू शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
दिवाळीच्या निमित्ताने वेढणी, सोनसाखळी, बांगड्या, पाटल्या, मंगळसूत्र, कर्णफुले, ब्रेसलेट अशा मोठ्या दागिन्यांच्या खरेदीला पसंती आहे. मंगळसूत्रांचे अनेक पर्याय सराफ व्यावसायिकांनी उपलब्ध करून दिले आहेत. त्याचप्रमाणे चांदीची जोडवी आणि इतर दागिन्यांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे.
“गेल्या महिनाभरात सोने आणि चांदीचा भाव अचानक वाढला. नागरिकांचा सोन्यावर असलेला विश्वास वाढत चालल्याने खरेदी वाढली आहे. गेल्या वर्षभरात सोन्याच्या भावात २५ टक्क्यांहून जास्त वाढला आहे. त्यामुळे आता भाव एकदम खूप कमी होण्याची शक्यता कमी आहे.
सध्या दिवाळीच्या निमित्ताने सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे बाजारात उत्साह दिसून येत असून ग्राहक पारंपरिक दागिन्यांसह विविध स्वरूपाचे दागिने खरेदी करीत आहेत”, अशी माहिती अतुल अष्टेकर, भागीदार, कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स यांनी दिली आहे.
तारीख : सोने (प्रति १० ग्रॅम) २४ कॅरेट, सोने (प्रति १० ग्रॅम) २२ कॅरेट, चांदी (प्रति किलो)
२० ऑक्टोबर २०२४: ७८,२२५ : ७१,८३५ : ९७,३००
२० सप्टेंबर २०२४: ७४,६५९ ६८,५६० : ८९,८३०
२० ऑक्टोबर २०२३ : ६१,०२४ : ५६,७९५ : ७२,७००
२१ ऑक्टोबर २०२२ : ५०,१४७ : ४७,९१२ : ५७,२००
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?