Gold-Silver Rate Today | सणासुदीची चाहूल लागल्याने सोने महागले, 70 हजारच्या जवळ पोहोचली किंमत, जाणून घ्या 22-24 कॅरेटचा दर
पुनेरी आवाज : Gold-Silver Rate Today | सराफा बाजारात आज 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 66,500 रुपये आणि 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 69,830 रुपये नोंदला गेला आहे. तर, चांदी प्रति किलो 90,300 रुपये दराने विकली जाईल. ( Gold-Silver Rate Today)
सराफा व्यापारी आणि इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे सदस्य मनीष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज चांदी प्रति किलो 90,300 रुपये दराने विकली जाईल. तर काल (शुक्रवार) सायंकाळपर्यंत चांदी 91,000 रुपये दराने विकली गेली होती.
सोन्याच्या दरात उसळी
मनीष शर्मा यांनी सांगितले की, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या दरात उसळी दिसून आली. 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम काल सायंकाळपर्यंत 66,200 रुपयांना विकले गेले.
आज सुद्धा याचा दर 66,500 रुपये ठरला आहे. म्हणजे दरात 300 रुपये वाढ झाली आहे. तर, शुक्रवारी लोकांनी 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 69,510 रुपये दराने खरेदी केले. आज त्याची किंमत 69,830 रुपये ठरवण्यात आली आहे. म्हणजे दरात 320 रुपये वाढ दिसून आली.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Rohit Pawar NCP (SP) | रोहित पवारांना लागले मंत्रिपदाचे वेध?