Gold Silver Rate Today | महिन्याच्या शेवटच्या दिवशीही सोन्याचा उच्चांक; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : Gold Silver Rate Today | गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याने 90,000 चा टप्पा ओलांडला. गुढीपाडव्याला सोने महाग झाले. सोमवार, आज सोने खरेदी करण्यासाठी ज्वेलर्सच्या दुकानांवर मोठी गर्दी दिसून येते. मार्चच्या शेवटच्या दिवशीही सोने महागले आहे. आजही सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (Multi Commodity Exchange) वर सोन्याच्या वायदा किंमती 466 रुपयांनी वाढून 88,850 रुपये प्रति 10 ग्रॅम दिसत आहे. गुढीपाडवाच्या मुहुर्तावर सराफा बाजारात सोन्याचा दर वधारला आहे. परंतु, दुसऱ्या दिवशी मात्र सोन्याचा दर कमी झाला. प्रति 10 ग्रॅमनुसार 24 कॅरेट सोन्याचा दर 91,190 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर हा 83,590 रुपये आहे. सराफा बाजारात कालच्या तुलनेत आज दर तसा कमी झालेला पाहायला मिळत आहे. दरात फक्त 10 रुपयांचा फरक दिसत आहे.
आज (31 मार्च) मात्र चांदीची चमक कमी झालेली पाहायला मिळाली. चांदीच्या दरात 10 रुपयाने घट झाल्याचे दिसते. आज चांदीचा एक किलोप्रमाणे 1,03,900 रुपये इतका आहे. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर चांदीचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे दिसून आले.
22 कॅरेट सोन्याचा दर
शहर – सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम)
मुंबई – 83,590 रुपये
पुणे – 83,590 रुपये
नागपूर – 83,590 रुपये
कोल्हापूर – 83,590 रुपये
जळगाव – 83,590 रुपये
ठाणे – 83,590 रुपये
आजचा 24 कॅरेट सोन्याचा दर
शहर – सोन्याचा भाव (प्रति 10 ग्रॅम)
मुंबई – 91,190 रुपये
पुणे – 91,190 रुपये
नागपूर – 91,190 रुपये
कोल्हापूर – 91,190 रुपये
जळगाव – 91,190 रुपये
ठाणे – 91,190 रुपये