Guillain-Barré Syndrome in Pune | पुण्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे रुग्ण वाढले, हा आजार कशामुळे होतो? लक्षणे काय आहेत? जाणून घ्या

Guillain-Barré Syndrome

पुणे : Guillain-Barré Syndrome in Pune | गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरचे रुग्ण पुण्यात वाढत आहेत. आतापर्यंत एकूण ५९ लोकांना या आजाराचे निदान झाले आहे. यापैकी १२ जण व्हेंटिलेटरवर आहेत. याबाबत पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बुधवार (दि.२२) राज्य आणि नागरी आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला. यामध्ये रुग्णालयांनी जीबीएस प्रकरणी पुणे महापालिकेकडे अहवाल दिला.

डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार माध्यमांशी बोलताना म्हणाले, ” बाधित व्यक्तींच्या संदर्भात अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. जीबीएस हा एक स्वयंप्रतिकार रोग आहे, जो शरीराच्या मज्जातंतूंवर हल्ला करणारे अँटीबॉडीज तयार करतो. हे एकतर गॅस्ट्रोइंटेस्टाइनल किंवा इन्फ्लूएंझा सारख्या आजाराचा परिणाम आहे. परंतु या आजाराला घाबरण्याची गरज नाही.”

लोकांना पिण्यासाठी पाणी उकळण्याचे, शिळे किंवा उघड्यावरचे अन्न खाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, ५९ रुग्णांपैकी ३३ रुग्ण पुण्यातील ग्रामीण भागातील, ११ महापालिका हद्दीतील आणि १२ पिंपरी चिंचवड महापालिकेतील आहेत. तीन रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत.

बाधितांमध्ये अकरा मुले ०- ९ वयोगटातील आहेत. बारा १०-१९ वयोगटातील आहेत. सात रुग्ण २०-२९ वयोगटातील आहेत. तर प्रत्येकी आठ रुग्ण ३०-३९ आणि ४०-४९ वयोगटातील आहेत. पाच रुग्ण ५०-५९ वयोगटातील, सात रुग्ण ६०-६९ वयोगटातील आणि एक व्यक्ती ७०-८० वयोगटातील आहे. आतापर्यंत एकूण बाधितांमध्ये ३८ पुरुष आणि २१ महिला रुग्ण आहेत. त्यांना विविध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

संसर्गजन्य रोग सल्लागार डॉ अमित द्रविड यांनी लोकांना घाबरू नये असे आवाहन केले. कारण कॅम्पिलोबॅक्टर संसर्ग असलेल्या प्रत्येक एक हजार लोकांपैकी फक्त एकाला हा आजार होतो.

या आजाराची लक्षणे काय आहेत?

अशक्तपणा
हातापायांना मुंग्या येणे
श्वास घेण्यात अडचण
चालताना त्रास होणे

गुइलेन बॅरे सिंड्रोम कशामुळे होतो?

या आजाराची लागण होण्याचे सर्वांत सामान्य कारण म्हणजे कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी
(पोल्ट्रीतील कोंबड्यांचे कच्चे किंवा कमी शिजलेले मांस खाल्ल्याने किंवा हाताळल्याने)
या विषाणूचे संक्रमण तसेच एपस्टाईन-बॅर व्हायरस,
सायटोमेगॅलॉव्हायरस किंवा झिका व्हायरस सारखे संक्रमण झाल्यासही याची लागण होते.
या संक्रमणामुळे रोगप्रतिकारक शक्ती उत्तेजित होते, जी नसांना लक्ष्य करते. काही प्रसंगी,
इन्फ्लूएन्झा किंवा टिटॅनस सारख्या काही लसी गुइलेन बॅरे सिंड्रोमसाठी कारणीभूत ठरू शकतात.
परंतु, लसीकरणाच्या फायद्यांच्या तुलनेत याचा धोका अत्यंत कमी आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Hindu Garjana Chasak 2025 | हिंदू गर्जना चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा लोगोचे युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते अनावरण;
दि. 7 ते 9 फेब्रुवारी दरम्यान रंगणार आखाडा (Video)

Pune Metro News | पुणेकरांसाठी गुड न्यूज! ‘या’ मेट्रो मार्गास केंद्र सरकारचा हिरवा कंदील,
वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न

You may have missed