Gujarat News | 23 वर्षीय शिक्षिकेकडे अल्पवयीन मुलाचा कोचिंग क्लास, दोघांमध्ये सूत जुळलं, 13 वर्षाच्या विद्यार्थ्यांसोबत शिक्षिका पसार, 5 महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती

गुजरात: Gujarat News | २३ वर्षीय शिक्षिका १३ वर्षाच्या विद्यार्थ्यांसोबत पळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. सुरत शहरात ही घटना घडली आहे. शिक्षिका मानसीकडे १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा कोचिंग क्लास लावलेला होता. विद्यार्थी दररोज तिच्या घरी शिकवणीसाठी जायचा. दरम्यान शिक्षिकेचे आणि त्याचे सूत जुळले. दोघांमध्येही शरीरसंबंधही झाले. त्यानंतर शिक्षिका १३ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार झाली.
कोचिंग क्लासला गेलेला मुलगा घरीच परतला नाही म्हणून कुटुंबीयांनी शोधाशोध केली. शिक्षिका विद्यार्थ्याला घेऊन पळून गेल्याचे समोर आले. यानंतर पोलीस ठाण्यात बेपत्ता आणि अपहरणाची तक्रार देण्यात आली. पोलिसांनी त्यांचा ठावठिकाणा शोधला.पोलिसांनी शिक्षिकेला अपहरणाच्या गुन्ह्यात अटक केली. तिला वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. त्यावेळी ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे रिपोर्टमधून माहिती समोर आली.
शिक्षिकेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ती आणि विद्यार्थी अनेक महिन्यांपासून सोबत आहेत. त्या दोघांमध्ये शरीरसंबंधही झाले आहेत. ‘माझ्या गर्भात असलेले बाळ त्या विद्यार्थ्याचेच आहे’, असा दावा शिक्षिकेने केला आहे. त्यामुळे अपहरणाच्या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. ते बाळ नक्की कुणाचे यासाठी पोलिसांकडून आता डीएनए चाचणी केली जाणार आहे.
सूरतचे पोलीस उपायुक्त भागीरथ गढवी यांनी माध्यमांना माहिती दिली की , २५ एप्रिल रोजी शहरातून जाण्यापूर्वी दोघांनी शॉपिंग केली. त्यानंतर दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी गेले. बडोद्याला गेले. नंतर अहमदाबाद. त्यानंतर ते दिल्लीला गेले. तिथेही खरेदी केली. वृंदावनला गेले, दर्शन केले आणि त्यानंतर जयपूरला आले. त्यांना तिथे राहायचे होते, पण त्यांना ते शक्य झाले त्यानंतर ते गुजरातला आले.”