Guruwar Peth Pune Crime News | कर्जफेड न केल्याने गहाण फ्लॅटचा ताबा घेण्यास गेलेल्या तहसीलदारासह कंपनी मॅनेजरला धक्काबुक्की

Khadak Police Station

सोसायटीच्या सचिवाची खंडणी, घरफोडीसारखे गुन्हे दाखल करण्याची धमकी

पुणे : Guruwar Peth Pune Crime News | कर्जफेड न केल्याने गहाण फ्लॅटचा ताबा घेण्यासाठी पोलिसांसह गेलेले तहसीलदार, फायनान्स कंपनीच्या मॅनेजरला धक्काबुक्की करुन खंडणी, घरफोडी सारखे गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्याचा प्रकार गुरुवार पेठेत घडला.

याप्रकरणी गौरव गौतम धनवे (वय ३१, रा. थेरगाव) यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुरुवार पेठेतील गुरुकृपा अपार्टमेंटचे सचिव व इतर १३ ते १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुकृपा अपार्टमेंटमध्ये २३ आॅगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ऑथम इन्व्हेस्टमंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि़ (पूर्वीची रिलायन्स होम फायनान्स) या कंपनीत ब्रँच मॅनेजर आहेत. त्यांच्या कंपनीने प्रसाद लगड यांना गुरुकृपा अपार्टमेंटमधील फ्लॅटसाठी ४७ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाचे हप्ते न भरल्याने ८३ लाख ६४ हजार रुपये गृहकर्ज थकीत झाले होते. कंपनीने जिल्हाधिकारी यांच्याकडून गहाण फ्लॅट ताब्यात घेण्याचा आदेश मिळविला. नायब तहसीलदार शंकर ठुबे, स्थानिक पोलीस यांना घेऊन फिर्यादी हे फ्लॅट ताब्यात घेण्यासाठी गेले होते.

घराला लावलेले कुलूपाची चावी चावीवाल्याकडून बनवून घेत असताना १३ ते १५ जण तेथे आले. त्यांनी आरडाओरडा करुन चावी तयार करायला विरोध केला. सोसायटीचे सचिव असल्याचे सांगणारे फिर्यादी व त्यांच्या सहकार्‍यांना शिवीगाळ करुन तुम्ही सोसायटीची परवानगी न घेता बेकायदेशीर काम करत आहात. आम्ही तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यांच्या सांगण्यावरुन त्यांच्यासह जमलेले सर्व जण फिर्यादी व त्यांच्या सहकार्‍यांच्या अंगावर धावून आले. तेव्हा पोलिसांनी मध्यस्थी करुन त्यांना बाजूला नेले. तरीसुद्धा जमलेले लोक त्यांना शिवीगाळ करुन येथून निघून जाण्याची धमकी देत होते. सोसायटीच्या सचिवाने तुमच्याविरुद्ध घरफोडीचे गुन्हे दाखल करु,
असे म्हणून त्यांना धक्काबुक्की करुन हाताने मारहाण करण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा पोलिसांच्या मदतीने नायब तहसिलदार शंकर ठुबे यांच्यासह फिर्यादी तेथून बाहेर पडून तक्रार देण्यासाठी खडक पोलीस ठाण्यात आले.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार नळे तपास करीत आहेत. (Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime News | मुलीच्या औषधाला नाही, दारुला पैसे आहेत, म्हटल्याने पत्नीचे डोके भिंतीवर आपटून जीवे मारण्याचा प्रयत्न

Maharashtra Assembly Election 2024 | मुंबईतील 7 जागा लढवण्याची शरद पवार गटाची तयारी; इच्छुक उमेदवारांची नावेही आली समोर; जाणून घ्या

BJP On Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती;
टूलकिट पुन्हा चर्चत?, विविध राज्यातील नेत्यांना प्रचारकार्यात उतरवण्याचा निर्णय

Eknath Shinde On Uddhav Thackeray | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा; म्हणाले – “मित्रपक्षांनाही जो चेहरा नकोसा झालाय, त्याला …”

You may have missed