Hadapsar Assembly Constituency | हडपसर ते मुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानापर्यंत शिवसैनिक पायी निघाले, नाना भानगिरे यांच्या उमेदवारीसाठी शिवसैनिक आक्रमक

eknath shinde-nana bhangire

पुणे: Hadapsar Assembly Constituency | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीतून राजकीय हालचालींना वेग आला आहे. काल भाजपने ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात पुण्यातील कोथरूड (Kothrud Assembly), पर्वती (Parvati Assembly), शिवाजीनगर (Shivaji Nagar Assembly) या तिन्ही मतदारसंघातील विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली. दरम्यान या मतदारसंघात इच्छुक नाराज झाले आहेत. ते बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत.

आज सायंकाळ पर्यंत शिवसेना (Shivsena Shinde Group), राष्ट्रवादीची (Ajit Pawar NCP) यादी येण्याची शक्यता आहे. दरम्यान हडपसर मतदारसंघातील शिवसैनिक अधिक आक्रमक झाले असून हडपसर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वर्षा बंगल्यावर (Varsha Bungalow) पायी चालत निघाले आहेत.

शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हडपसर मतदारसंघ हा शिवसेनेसाठी सोडावा आणि या जागेवरून नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire) यांना उमेदवारी देण्यात यावी, या मागणीसाठी शिवसैनिक पायी चालत निघाले आहेत.

शहरातील हडपसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चेतन तुपे (Chetan Tupe) हे आमदार असून त्यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. दुसर्‍या बाजूला याच मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी आणि शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे हे देखील इच्छुक आहेत. या दोघांपैकी कोणाला उमेदवारी द्यायची हा पेच महायुतीमधील नेत्यासमोर निर्माण झाला आहे.

त्याच दरम्यान काल सायंकाळी शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांना हडपसरमधून उमेदवारी दिली जावी, या मागणीसाठी हजारो शिवसैनिक आणि नागरिकांनी प्रभू श्रीराम यांच्या चरणी प्रार्थना आणि महाआरती केली. या माध्यमांतून नाना भानगिरे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे.

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Mumbai High Court News | ’50 खोके एकदम ओके’ ची घोषणा गुन्हा नाही, हायकोर्टाने फटकारले;
सरकारने अपेक्षा भंग केल्यास उद्रेक तर होणारच – हायकोर्टाचे निरीक्षण

Ravindra Dhangekar | दिवाळी कीट वाटपप्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या संस्थेवर गुन्हा दाखल; धंगेकर म्हणाले – ‘नागरिकांच्या घरात आनंदाची पणती प्रज्वलित व्हावी, म्हणून…’

Maharashtra Assembly Election 2024 | जागावाटपावरून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा; मविआत वाद चिघळला

Helmet Compulsory In Pune | पुण्यात हेल्मेटसक्ती! सुप्रीम कोर्टाने स्थापन केलेल्या रस्ता सुरक्षा समितीचे निर्देश

Chinchwad Assembly Election 2024 | चिंचवड विधानसभा निवडणुकीतून अश्विनी जगताप यांची माघार;
शंकर जगताप यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?

You may have missed