Hadapsar Assembly Election 2024 | हडपसरच्या उमेदवारीबाबत पुनर्विचार करण्याचा प्रस्ताव; अन्यथा हडपसर विकास आघाडी करून उमेदवार देण्याचा इशारा; राजकीय घडामोडींना वेग

पुणे : Hadapsar Assembly Election 2024 | हडपसर विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्यावरून महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) नाराजीनाट्य सुरु आहे. याबाबत स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांनी खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांची भेट घेत दिलेल्या उमेदवारीबाबत पुनर्विचार करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
हडपसरला आघाडीचा उमेदवार हा हडपसर मधीलच हवा. म्हणून आघाडीतील नाराज इच्छुकांनी कंबर कसली असून सध्या घोषित केलेला उमेदवार देण्यापेक्षा दुसरा कोणताही उमेदवार द्यावा. अन्यथा हडपसर विकास आघाडी (Hadapsar Vikas Aghadi) करून उमेदवार दिला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
२००२ साली झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत दिलीप तुपे (Dilip Tupe) व दत्तोबा ससाने (Dattoba Sasane) यांनी हडपसर विकास आघाडी नावाने पॅनल उभे केले होते. तो प्रयोग यशस्वी झाला होता. यावेळी सुद्धा अशाच प्रकारे विकास आघाडी स्थापन करून हडपसर विधानसभेसाठी उमेदवार देण्याचा विचार सुरू आहे.
यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Thackeray Group) , राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar NCP) व काँग्रेस पक्षातील (Congress) इच्छुकांनी खूनगाठ बांधलेली आहे. त्यांच्यासोबत या पक्षातील बहुतांश नगरसेवक सुद्धा दिसत आहेत. आज मुंबई येथे खासदार अमोल कोल्हे यांची भेट घेऊन त्यांनी उमेदवारी बाबत पुनर्विचार करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
अमोल कोल्हे यांनी आमचे म्हणणे ऐकून घेतले, ते वरिष्ठांपर्यंत आमच्या भावना पोहोचवणार आहेत.
आमच्या मागणीला न्याय मिळेल, असा विश्वास सर्व पक्षातील इच्छुकांनी व्यक्त केला. महादेव बाबर, योगेश ससाने,
आनंद अलकुंटे, बाळासाहेब शिवरकर, निलेश मगर, समीर तुपे, बंडू गायकवाड असे तीनही पक्षातील इच्छुक आता एकत्र झाले आहेत. (Hadapsar Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Maval Assembly Election 2024 | मावळ विधासभा मतदारसंघात नाट्यमय घडामोडी; यंदाची निवडणूक रंगतदार होणार
Sharad Pawar NCP Vs Ajit Pawar NCP | पुण्यातील 21 पैकी 8 जागांवर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकमेकांना भिडणार;
कोणत्या पवारांची पॉवर निर्णायक ठरेल? राजकीय वर्तुळात चर्चा