Hadapsar Assembly Election 2024 | हडपसर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगतापांकडून सर्वपक्षीय गाठीभेटी अन थोरामोठ्यांचा आशीर्वाद

Prashant Jagtap-Ranjana Tilekar

हडपसर मतदारसंघात प्रशांत जगतापांचे सर्वत्र स्वागत; समतेचा लढा, न्यायाचा लढा यशस्वी होणार

पुणे : Hadapsar Assembly Election 2024 | हडपसर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी अन थोरामोठ्यांचा आशीर्वाद घेण्यावर भर दिला आहे. कोंढव्यातील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथाचे दर्शन घेत जगताप यांनी मतदारसंघाच्या विकासाला गती देण्याचे, सर्वधर्मियांना सोबत घेऊन काम करण्याचे बळ मिळावे, असा आशीर्वाद घेतला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, झुंजार नेतृत्व वसंत मोरे यांची भेट घेतली. वसंततात्यांसारखा न्यायप्रिय, लढवय्या नेता पाठीशी असल्याने विजय सुकर होईल, अशी भावना जगताप यांनी व्यक्त केली. भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे आमदार योगेशअण्णा टिळेकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत जगताप यांनी माजी नगरसेविका रंजनाताई टिळेकर व त्यांचे बंधू चेतन टिळेकर यांच्यासोबत संवाद साधला. टिळेकर परिवाराने आपुलकीने जगताप यांचे स्वागत करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यासह जगताप यांनी कोंढवा खुर्द येथील इम्तियाजभाई शेख, हभप गुलाबानाना कामठे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भरतशेठ धर्मावत, माजी नगरसेविका संगीताताई ठोसर, भाजपचे ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जगताप यांचे स्वागत केले.

राजकीय स्वार्थासाठी अल्पसंख्यांक समाजाला दुय्यम वागणूक देणाऱ्या प्रवृत्ती घातक आहेत. या प्रवृत्तींना हद्दपार करून समता प्रस्थापित करायची आहे. यामध्ये सर्वांचे सहकार्य गरजेचे असून, सर्वांना सोबत घेऊन माझी वाटचाल करत आहे. संत-महंतांचे आशीर्वाद बळ देणारे आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह सर्वच पक्षातील नेत्यांकडून व पदाधिकाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद, आशीर्वाद मिळत असल्याने माझा आत्मविश्वास दुणावत आहे, अशी भावना प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Hadapsar Assembly Election 2024 | प्रशांत जगताप यांच्या प्रचाराचा बुधवारी शुभारंभ ! मध्यवर्ती निवडणूक कचेरीचे उद्घाटन, केशवनगर-कोंढव्यात पदयात्रेचे आयोजन

Raj Thackeray | पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांची पक्षविरोधी भूमिका; राज ठाकरेंनी घेतली दखल; कारवाईचे संकेत

Hadapsar Assembly Election 2024 | ‘तळ्यात मळ्यात’च्या भूमिकेने हडपसरचे आमदार चेतन तुपे यांच्यापुढील आव्हान वाढले?

Kasba Assembly Election 2024 | कसबा मतदारसंघात यंदा ‘हे’ 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात; जनता कोणाला कौल देणार?

You may have missed