Hadapsar Assembly Election 2024 | प्रशांत जगताप यांच्या प्रचाराचा बुधवारी शुभारंभ ! मध्यवर्ती निवडणूक कचेरीचे उद्घाटन, केशवनगर-कोंढव्यात पदयात्रेचे आयोजन
पुणे : Hadapsar Assembly Election 2024 | हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांच्या जाहीर प्रचाराचा बुधवारपासून भव्य शुभारंभ होणार आहे. हडपसरमधील भोसले गार्डन येथे मध्यवर्ती निवडणूक कचेरीचे उद्घाटन करण्यात येणार असून, या ठिकाणाहून हडपसर मतदारसंघाच्या प्रचाराचे सर्व नियोजन होणार आहे. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटक पक्षांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित राहणार आहेत.
निवडणूक कचेरीचे उद्घाटन झाल्यानंतर भोसलेनगर, मगरपट्टा सिटी, सोलापूर रस्ता, लोहियानगर, मुंढवा, धायरकर वस्ती, पिंगळे वस्ती, वडबन परिसर, मुंढवा गावठाण, केशवनगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पवारवस्ती, कुंभारवाडा, रेणुकामाता मंदिर भोईवस्ती, गोदरेज प्रॉपर्टीज, हनुमाननगर, म्हसोबा वस्ती, ऑरबिज स्कुल, गुरुकृपा सोसायटी, लोणकर वस्ती, आनंदनगर, शिंदे वस्ती या भागात प्रशांत जगताप पदयात्रा काढणार आहेत.
“महाविकास आघाडीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. समाजातील सर्व घटक माझ्या पाठीशी उभे राहत आहेत. घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी सुरु आहेत. महाविकास आघाडीतील सर्व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन चळवळीतील, पुरोगामी व समतेच्या विचारांच्या संस्था, संघटना झोकून देऊन काम करत ‘तुतारी वाजवणारा माणूस’ जनमाणसांपर्यंत पोहोचवत आहेत.”
- प्रशांत जगताप, महाविकास आघाडीचे उमेदवार
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा