Hadapsar Assembly Election 2024 | प्रशांत जगताप यांच्यासाठी सुप्रियाताईंची बाईक रॅली; हडपसर मतदारसंघातील कात्रज-कोंढवा परिसरात सुप्रिया सुळे यांचा मतदारांशी संवाद
उद्धव ठाकरे यांची बॅग तपासणे हे सुडाचे राजकारण – सुप्रिया सुळे
पुणे : Hadapsar Assembly Election 2024 | हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) अधिकृत उमेदवार प्रशांत सुदाम जगताप (Prashant Jagtap) यांच्या प्रचारासाठी आयोजित बाईक रॅलीमध्ये सहभागी होत संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मतदारांशी संवाद साधला. कात्रज तलावाजवळील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन सुप्रिया सुळे यांनी बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले. रॅलीदरम्यान विविध ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वसंततात्या मोरे, माजी उपमहापौर बंडूतात्या गायकवाड, माजी नगरसेवक योगेश ससाणे, दिलीप तुपे, प्रवीण तुपे, समीर तुपे, निलेश मगर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, महिला पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी झाले.
‘रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी’चा जयघोष करीत निघालेल्या या रॅलीमुळे परिसरात जल्लोषाचे व चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले. कात्रज गावठाण, गोकुळनगर चौक, कान्हा हॉटेल चौक, साळवे गार्डन, कोंढवा बुद्रुक, साईनगर, भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द या भागातून ही रॅली निघाली. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी सुप्रिया सुळे व प्रशांत जगताप यांच्याशी संवाद करीत आपल्या समस्या मांडल्या. सुळे यांनीही सर्वांचे गाऱ्हाणे ऐकून विकासाची हमी दिली व येत्या काळात प्रशांत जगताप यांच्या माध्यमातून परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असा विश्वास दिला.
पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “ही लढाई कौटुंबिक नसून, वैचारिक आहे. आम्ही अन्यायाविरुद्ध लढत आहोत. आमच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात येत आहेत. हे म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असा प्रकार आहे. आमच्यावरील आरोप खरे असतील, तर आम्ही कोर्टामध्ये जाण्यासाठी तयार आहोत. हडपसरच्या विकासासाठी प्रशांतदादा जगताप हेच योग्य पर्याय आहेत. त्यामुळे येत्या २० तारखेला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ चिन्हासमोरील बटण दाबून तुम्ही त्यांना विजयी करावे असे आवाहन करते.”
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बॅग तपासण्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझीही गाडी काल चेक केली. मला याचा आनंद आहे आणि उपस्थित अधिकार्यांना याबाबत प्रोत्साहनही दिले. त्यांनी जरूर सर्व चेक करावे. परंतु, उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांची बॅग तपासणे हे सुडाचे राजकारण आहे. अजित पवारांविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, बारामती विधानसभा मतदारसंघ शरद पवार यांनी मागील सहा दशके मेहनत घेऊन उभा केला आहे. यामध्ये इतरांनीही काही ना काही योगदान दिले आहे. याचा अर्थ दुसऱ्या कोणी एकाने श्रेय घेणे योग्य नाही. ही परिवाराची लढाई नाही. या वैचारिक लढाईत कोणाला विजयी करायचे हे महाराष्ट्राची आणि बारामतीची मायबाप जनता ठरवेल. एक पारदर्शक आणि नवीन पिढीचा एक स्वच्छ चारित्र्याचा मुलगा, सुशिक्षित व सुसंस्कृत चेहरा म्हणून युगेंद्र बारामतीमध्ये जनतेपुढे जात आहे.”
प्रशांत जगताप म्हणाले, “सुप्रियाताईंच्या दौऱ्याने मतदारसंघात आपली ताकद आणखी वाढली आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यापाठोपाठ आज ताईंची बाईक रॅली झाल्याने आम्हा सर्व कार्यकर्त्यांसह मतदारांमध्येही उत्साह निर्माण झाला आहे.
हडपसरच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यावर शाश्वत उपाययोजना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
यामध्ये हडपसरची जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे, हे पहिल्या दिवसापासून पाहायला मिळत आहे.
मतदानाचा दिवस जसजसा जवळ येतो आहे, तसा विजयाचा विश्वास आणखी दृढ होत आहे.” (Hadapsar Assembly Election 2024)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Jayant Patil On Vasant More | पुन्हा एकदा वसंत मोरे पक्ष बदलणार? जयंत पाटलांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा; म्हणाले – “वसंत मोरे यांच्या हातात आम्ही कधीही तुतारी देऊ”
Shivaji Nagar Assembly Election 2024 | “मनीष आनंद यांच्या माध्यमातून विकासकामे झाली असल्याने आम्ही त्यांच्यासोबत”, शिवाजीनगरमधील नागरिकांचा निर्धार
Maval Assembly Election 2024 | सुनील शेळकेंच्या आमदारकीची वाट बिकट; बापू भेगडेंचे कडवं आव्हान,
मतदारसंघ पिंजून काढण्याची वेळ