Hadapsar Assembly Election 2024 | महायुतीतील ‘पुरंदर’च्या लढ्याचे लोन ‘हडपसर’मध्ये पसरण्याची शक्यता !

Eknath Shinde-Ajit Pawar-Vijay Shivtare-Chetan Tupe

पुणे : Hadapsar Assembly Election 2024 | ‘पुरंदर’ विधानसभा मतदार संघात (Purandar Assembly Constituency) शिंदे यांच्या शिवसेनेचे (Shivsena Shinde Group) एकमेव उमेदवार माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्या विरोधात महायुतीतील (Mahayuti) अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (Ajit Pawar NCP) बंडखोरी केल्याचा फटका पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘हडपसर’ येथील उमेदवाराला बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना महायुतीमध्ये जिल्ह्यात पुरंदर हा एकच मतदार संघ वाट्याला आला आहे. या ठिकाणी शिवसेनेने काँग्रेस महाविकास आघाडीचे (Mahavika Aghadi) उमेदवार आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap MLA) यांच्या विरोधात माजी मंत्री विजय शिवतारे यांना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीतून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे संभाजी झेंडे (Sambhaji Zende) यांनी येथे बंडखोरी करत अर्ज कायम ठेवला आहे. अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यातील राजकीय वैमनस्य संपूर्ण जिल्ह्यात माहिती आहे.

नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Ajit Pawar) यांच्या विरोधात बंडखोरी करण्याचे जाहीर करत शिवतारे यांनी पंगा घेतला होता. परंतु अखेरच्या क्षणी वरिष्ठ पातळीवरून त्यांचे बंड शमवत विधानसभेला पाठिंबा देण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिले होते. परंतु लोकसभा निवडणुकीत पुरंदर मधून सुनेत्रा पवार या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात तब्बल ३५ हजार मतांनी मागे राहिल्या. यातून शिवतारे यांनी माघारीनंतर पवार यांचे कामच केले नाही असा मेसेज राष्ट्रवादी मध्ये गेला.

त्यामुळे अजित पवार यांनी पूर्वी विरोधात असताना शिवतारे यांच्याबद्दल केलेल्या ‘तू निवडूणच कसा येतो बघतो’ या विधानाची आठवण ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी येथे बंडाचे निशाण उभारले. यावरून शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाल्याने पुरंदर मध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये ‘वॉर’ सुरू झाले आहे.

पुरंदर मतदार संघातील दिवे घटाखालील फुरसुंगी, उरुळी देवाची, येवलेवाडी, हांडेवाडी बराचसा भाग हा महापालिकेत आहे. याला लागूनच हडपसर मतदार संघ असून येथून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार चेतन तुपे (Chetan Tupe) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येथे शिंदे यांच्या शिवसेनेची ताकत देखील बऱ्यापैकी आहे. जिल्ह्यातील एकमेव उमेदवाराला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कडून मिळत असलेल्या वागणुकीला त्याच पद्धतीने उत्तर देण्यासाठी येथील शिवसैनिक आक्रमक होत आहेत. वरकरणी युतिधर्म पाळताना दिसत असले तरी ऐनवेळी धक्का देण्याच्या मानसिकतेत दिसत असल्याचे येथील शिवसैनिकांशी चर्चा केल्यावर दिसत आहे. यातून मार्ग काढण्याचे तुपे यांच्यासमोर आव्हान आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Punit Balan Group (PBG) | ‘पुनीत बालन ग्रुप’चा पैलवान सिकंदर शेख 2024 चा रुस्तुम-ए-हिंद ! किताब जिंकणारा महाराष्ट्रातील चौथा कुस्तीपटू

Raj Thackeray | पुण्यात मनसे पदाधिकाऱ्यांची पक्षविरोधी भूमिका; राज ठाकरेंनी घेतली दखल; कारवाईचे संकेत

You may have missed