Hadapsar Assembly Election 2024 | ‘मतदानाची तारीख वीस, घरी पाठवा शिंदे-पवार-फडणवीस’ ! लबाडी करणाऱ्या गद्दारांना घरी बसवून महाराष्ट्र धर्म जागवा; डॉ. अमोल कोल्हे यांचा निशाणा

Prashant Jagtap-Amol Kolhe

प्रशांत जगताप यांच्या प्रचारार्थ हडपसरमध्ये बाईक रॅली व जाहीर सभा

पुणे : Hadapsar Assembly Election 2024 | “महाराष्ट्रातील ऐंशी मतदारसंघात गद्दारी झाली. त्यात हडपसरचाही समावेश होता. इथला विद्यमान आमदार गद्दारी करून दुसरीकडे गेला. मात्र, या संघर्षाच्या काळात प्रशांत जगताप (Prashant Jagtap) ढाल बनून पवार साहेबांच्या सोबत राहिले. गद्दारीचा कलंक कितीही गुलाबी रंग लावला तरी पुसला जाणार नाही. ही निवडणूक विचारांची, महाराष्ट्र धर्म जागवण्याची आहे. चोरी व लबाडी करून मोठी होणारी ही माणसे आहेत. त्यांना इमानदारीने भाजी-भाकरी खाणारा चांगला माणूस घरी बसवणार आहे,” अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Sharad Pawar NCP) खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केली.

हडपसर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत सुदाम जगताप यांच्या प्रचारार्थ हडपसरमध्ये आयोजित जाहीर सभेत डॉ. अमोल कोल्हे बोलत होते. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर अंकुश काकडे, माजी नगरसेवक योगेश ससाणे, विजय देशमुख, दिलीप आबा तुपे, दिलीप शंकर तुपे, समीर तुपे, प्रवीण तुपे, कुमार तुपे, प्रशांत सुरसे, पल्लवी सुरसे, नितीन आरु, महेंद्र बनकर, संजय सपकाळ यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी अपक्ष उमेदवार सुशील मते यांनी प्रशांत जगताप यांना पाठींबा दिला.

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, “राज्यात ‘भाई-दादा-भाऊ, आपण तिघे मिळून सगळे खाऊ’ अशी स्थिती आहे. एका हाताने दिल्यासारखे दाखवून दहा हातानी काढून घेत आहेत. भरमसाठ महागाई वाढली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. जीएसटीचा बोझा वाढवला आहे. जन्माला आलेल्यापासून तिरडीवर जाणाऱ्यापर्यंत सगळ्यांकडून जीएसटी वसूल केला जात आहे. राज्यात दिवसाला आठ, महिन्याला दोनशे शेतकरी आत्महत्या करत असताना, हे लोक गुलाबी जॅकेट घालून चमकोगिरी करत आहेत. काळ्या आईची सेवा करणाऱ्या माझ्या शेतकऱ्याची चेष्टा लावली आहे. त्यामुळे पक्ष, चिन्ह पळवून आपल्या बापाशी गद्दारी करणाऱ्यांना घरी बसवावे लागेल.”

“हडपसरमध्ये संधी दिलेला आमदारही गद्दार निघाला. या दिवट्याने गेल्या पाच वर्षात कोणतेही ठोस काम केले नाही. हडपसरमध्ये वैयक्तिक महत्वाकांक्षा लादून जाती-पातीचे विष कालवण्याचे काम होत आहे. हा डाव आपल्याला उधळून लावायचा आहे. राज्यात फिरतोय, महाविकास आघाडीचे सरकार येणार हे स्पष्ट दिसतेय. सरकार येताच सहा महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. हडपसर स्वतंत्र महापालिका होईल. त्यासाठी काळजीपूर्वक ‘तुतारी वाजवणारा माणूस’ चिन्हासमोरील बटण दाबून प्रशांत जगताप यांना मतदान करा.

आपण दिलेले मत चुकून दुसरीकडे गेले, तर ते शरद पवारांच्या विरोधात, फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचाराच्या विरोधात असेल. मतदान करताना आपल्यासाठी छप्पर धरलेल्या, भिंती बांधलेल्या, रक्त आठवलेल्या बापाला आठवा. गनिमी काव्याने त्याचे घर काढून घेतल्यावर त्याची अवस्था जशी होईल, तशी अवस्था दोन वर्षांपूर्वी पवार साहेबांची झाली. त्यांचा पक्ष नेला, चिन्ह नेले. त्यांना एकटे पाडले. मात्र, हा आपला बापही लेचापेचा नाही. वयाच्या ८४ व्या वर्षीही महाराष्ट्र पिंजून काढत निष्ठावान कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम तो करतोय. त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे,” असेही डॉ. अमोल कोल्हे यांनी नमूद केले.

प्रशांत जगताप म्हणाले, “ही निवडणूक गद्दारी विरुद्ध निष्ठा अशी आहे. या राज्यात ८० आमदार विकले गेले.
पक्षाशी त्यांनी गद्दारी केली. हडपसरचा आमदारही मलिदा गँगमध्ये सामील झाला. त्याने पक्षाशी गद्दारी केली.
जो आपल्या पक्षाचा, नेत्याचा होऊ शकत नाही, तो समाजाचा कधी होत नाही.
त्यामुळे हडपसरचा स्वाभिमानी मतदार हा डाग पुसून काढण्यासाठी सज्ज झाला आहे.
गेल्या पाच वर्षात या आमदार महोदयांनी एकही काम केले आहे का? पाणीप्रश्न,
वाहतूक कोंडी सोडवली आहे का? महिलांची सुरक्षा राखली आहे का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
पक्षाशी प्रतारणा करणाऱ्या व्यक्तीवर बाहेरच्या राज्यातील व्यक्तींनी सभा घ्यायची वेळ आली आहे,
ही नशिबाने केलेली त्यांची थट्टा आहे. त्याचा विचार करून जनता यंदा ‘ना’चा पाढा वाचणाऱ्या चेतन तुपे यांना घरी बसवणार, याची खात्री मला आहे.” (Hadapsar Assembly Election 2024)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Kasba Peth Assembly Election 2024 | भाजपने गोवा निवडणुकीचा खर्च स्थायी समितीतून मिळालेल्या पैशातून केला;
‘मनसे’चे उमेदवार गणेश भोकरे यांचा हेमंत रासने यांच्यावर हल्लाबोल

Maharashtra Assembly Election 2024 | उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र;
म्हणाले – ‘आधी स्वत:चं जॅकेट सांभाळा, मग धर्मयुद्ध करा’

Vadgaon Sheri Assembly Election 2024 | वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ : बापुसाहेब हे सामान्यांचे आधार – खासदार नीलेश लंके

You may have missed