Hadapsar – Kothrud Assembly Constituency | हडपसर आणि कोथरूड मतदारसंघावरून शिवसेना ठाकरे गट आग्रही; ठाकरे-पवार गटात रस्सीखेच
पुणे : Hadapsar – Kothrud Assembly Constituency | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena UBT) कोथरूड आणि हडपसर विधानसभा मतदारसंघांवर दावा सांगितल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटापुढे (Sharad Pawar NCP) अडचण निर्माण झाली आहे.
https://www.instagram.com/p/DAGuidWC7D2
हडपसर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने दावा सांगितला आहे. माजी आमदार महादेव बाबर (Mahadev Babar) आणि नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले वसंत मोरे (Vasant More) या ठिकाणाहून लढण्यासाठी इच्छुक आहेत. शिवसेनेला जिल्ह्यातही फारसे मतदारसंघ मिळतील अशी परिस्थिती नाही. त्यामुळे पुणे शहरातून कोथरूड आणि हडपसरसाठी ठाकरे यांनी आग्रह धरल्याचे सांगण्यात येत आहे.
https://www.instagram.com/p/DAGod-kimk7
त्यामध्ये कोथरूड हा मतदारसंघ शिवसेनाच लढेल, याबद्दल महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) स्पष्टता आहे. मात्र, हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार निवडून आल्याने हा मतदारसंघ ‘राष्ट्रवादी कडे राहील, अशी माहिती आहे.
https://www.instagram.com/p/DAGmGj2CHED
राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून हडपसरमध्ये प्रशांत जगताप (Prashant Jagtap) लढण्यास इच्छुक आहेत. हडपसरचे विद्यमान आमदार चेतन तुपे (Chetan Tupe) राष्ट्रवादी अजित पवार गटात (Ajit Pawar NCP) आहेत. त्यामुळे विधानसभेला या दोघात सामना होऊ शकतो अशी चर्चा आहे.
https://www.instagram.com/p/DAGcj3DCHPH
दरम्यान हडपसर आणि कोथरूड दोन्ही मतदारसंघावरून राष्ट्रवादी शरद पवार गट आणि
शिवसेना ठाकरे गटात रस्सीखेच सुरु असल्याचे दिसत आहे. (Hadapsar – Kothrud Assembly Constituency)
https://www.instagram.com/p/DAGKMIlpMAy
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा