Hadapsar Pune Accident News | मद्यपान करून भरधाव वेगात रिक्षाचालकाने महिलेला उडविले; महिलेचा अपघातात मृत्यू

Chandani Chowk Pune Accident | Drunk Driver Hits Delivery Boy in Pune; Victim Suffers Rib Fractures, Case Registered

पुणे : Hadapsar Pune Accident News | मद्यपान करून भरधाव वेगात रिक्षा चालवून चालकाने महिलेला उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शेवाळवाडी भाजी मार्केटच्या समोर घडली. अपघातात महिलेचा मृत्यू झाला. सारिका राजेंद्र चव्हाण (वय ३८, रा. लोणी काळभोर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना २५ ऑगस्ट रोजी शेवाळवाडी भाजी मार्केटच्या समोर घडली. हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) रिक्षा चालकाला अटक केली आहे.

याप्रकरणी अमोल सज्जन कानगुडे (वय ३६, रा. वाडगे वस्ती, लोणी काळभोर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार आनंद रविंद्र दोडके (वय ४०, रा. हिंगणे मळा, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रिक्षा चालक आनंद दोडके दारुच्या नशेत भरधाव वेगात रिक्षा चालवत हडपसरवरुन लोणीकडे जात असताना त्याने शेवाळवाडी येथे भाजी विक्री करणाऱ्या सारिका चव्हाण यांना जोराची धडक दिली. यात सारिका या गंभीर जखमी झाल्या. (Hadapsar Pune Accident News)

त्यांच्या मेंदूला मार लागला होता.
त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केल्याचे फिर्यादेत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गांधले करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sanjay Gaikwad On Badlapur Case | बदलापूर प्रकरणावरून शिंदे गटाच्या नेत्याचे अजब विधान, म्हणाले –
“आता काय मुख्यमंत्री शाळेत जाऊन पहारा देतील का?”

Kondhwa To Delhi Samajik Nyay Yatra | ‘कोंढवा ते दिल्ली’ सामाजिक न्याय पदयात्रा 1 सप्टेंबर पासून

Malabar Gold & Diamonds | मलाबार गोल्ड अँड डायमंड्सला 2023-24 साठी प्रतिष्ठित ‘इंडिया गोल्ड कॉन्फरन्स’ पुरस्काराने केले सन्मानित

Chief Engineer Rajendra Pawar | मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांना उत्कृष्ट ग्राहक सेवा पुरस्कार प्रदान

You may have missed