Hadapsar Pune Crime News | मोटारसायकल चालकाने पोलीस हवालदाराला नेले फरफरटत; हडपसर इंडस्ट्रीयल चौकातील घटना

Hadapsar Police Station

पुणे : Hadapsar Pune Crime News | सिग्नल बंद असताना विना नंबर प्लेटची गाडी घेऊन येणार्‍या मोटारसायकलचालकाला वाहतूक पोलीस हवालदारांनी (Pune Traffic Police) थांबविले. गाडी बाजूला घेण्यास सांगितले. तेव्हा त्याने त्याने गाडी रेस केली. हवालदाराने त्याच्या दंडाला पकडले असतानाही त्यांना चालकाने १०० मीटर फरफरटत नेऊन दुखापत केली.

पोलिसांनी ऋतिक प्रकाश हिंगणे Hrithik Prakash Hingane (वय २३, रा. प्रतिभा रेसिडेन्सी, हिंगणे मळा, हडपसर) याला अटक केली आहे. ही घटना हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेट (Hadapsar Industrial Estate) कडील रोडवर बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. याबाबत वाहतूक पोलीस हवालदार चेतन सुलाखे (वय ४२) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हडपसर वाहतूक विभागात डायव्हर्जन बंदोबस्तासाठी सकाळी ९ पासून कामावर उपस्थित होते. हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेटकडून येणार्‍या मार्गावरुन येणार्‍या वाहनांना मागेच थांबवून त्यांना मगरपट्टा ब्रीजखालून (Magarpatta Bridge) वळून मुख्य रस्त्यावर येण्याबाबत सुचना देण्याकरीता तसेच त्या ठिकाणी वाहतूक नियमन करण्याचे काम ते करत होते. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हडपसरच्या दिशेने जाणारी वाहने सिग्नल लागल्याने थांबली होती.

त्यावेळी एक मोटारसायकलस्वाराच्या गाडीला नंबर प्लेट नव्हती. फिर्यादी यांनी त्यांना गाडी बाजूला घेण्यास सांगितले. त्याला गाडी नंबर व लायसनची मागणी केली. त्याने लायसन नसल्याचे सांगितले. पाठीमागे बसलेली तरुणी मोटारसायकलवरुन उतरली. त्याने गाडी बाजूला घेतो, असे सांगून लगेच चावी लावून गाडी स्टार्ट केली़ व पुढे जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा फिर्यादी यांनी त्याच्या दंडाला पकडले. त्यास थांबण्याची विनंती केली. तेव्हा त्याने मोटारसायकल रेस करुन फिर्यादी यांना ९० ते १०० मीटर फरफरटत नेले. त्यामुळे त्यांच्या गणवेशावरील पँट फाटून दोन्ही गुडघ्यांना दुखापत झाली.
त्यांचा बुट फाटला. काही अंतर गेल्यावर त्याचा मोटारसायकलवरील ताबा सुटल्याने त्याने मोटारसायकल थांबविली.
वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक खांडे तसेच पोलीस अंमलदार आगाव, राठोड व इतर जण मदतीसाठी धावत आले.
त्याने हिंगणे याला पकडले. या मोटारसायकलला नंबर प्लेट नव्हत. तसेच तिचा इन्शुरन्सही भरला नसल्याचे आढळून आले.
पोलीस उपनिरीक्षक उमेश रोकडे (PSI Umesh Rokde) तपास करत आहेत. (Hadapsar Pune Crime News)

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar Z+ Security Cover | झेड प्लस सुरक्षेबाबत संशय, शरद पवार तातडीने दिल्लीला रवाना; घडामोडींना वेग

Pune Crime Branch News | खूनासह 4 गुन्हे असलेल्या गुंडाकडून पिस्टल व एक जिवंत राऊंड जप्त; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

Ganesh Biradar | बारामती अपर पोलीस अधीक्षकपदी गणेश बिरादार

Sadashiv Peth Pune Fire News | आग लागलेल्या घरातून श्वानाची सुखरुप सुटका; सदाशिव पेठेतील रमेश डाईंगजवळील घटना