Hadapsar Pune Crime News | हडपसर पोलीस ठाण्यातून पळून गेलेल्या सोनसाखळी चोर महिलेला छत्रपती संभाजीनगर मधून अटक

woman-arrested

पुणे : Hadapsar Pune Crime News | पालखी सोहळ्यात (Palkhi Sohala) दर्शन करण्यासाठी आलेल्या महिलेचे दागिने चोरणाऱ्या महिला आरोपीला हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) अटक केली होती. आरोपी महिलेला हडपसर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर तिने पोलिसांची नजर चुकवून पोलीस ठाण्यातून पलायन केले होते. पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिला छत्रपती संभाजीनगर परिसरातून अटक केली. धुरपता अशोक भोसले (वय-31 रा. टाकळी ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) असे अटक केलेल्या सोनसाखळी चोर महिलेचे नाव आहे. (Chain Snatcher Woman Arrested)

हडपसर भागात पालखी सोहळा आल्यानंतर दर्शनासाठी आलेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या धुरपता भोसलेला हडपसर पोलिसांनी 3 जुलै रोजी अटक केली होती. तिला तपासासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या कोठडीतून हडपसर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणले होते. त्यावेळी पोलिसांचे लक्ष चुकवून भोसले हडपसर पोलीस ठाण्यातून पसार झाली होती. या घटनेची माहिती तात्काळ वरिष्ठांना देण्यात आली.

हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी आरोपी धुरपता भोसले रिक्षातून मुंढव्याच्या दिशेने गेल्याचे आढळून आले. नगर रस्ता परिसरात आली. तिथून ती बसने छत्रपती संभाजीनगरकडे गेल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांचे एक पथक छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले. टाकळी गावातून धुरपता भोसले हिला ताब्यात घेण्यात आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर. राजा, सहायक आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक गुन्हे निरीक्षक मंगल मोढवे, उमेश गिते, सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेश कवळे, सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, ज्योतीबा पवार, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे यांच्या पथकाने केली.

महिला पोलीस शिपाई निलंबित

दरम्यान, पोलीस उपायुक्त परिमंडळ-5 आर राजा यांनी कर्तव्यात बेजबाबदार
व निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवून महिला पोलीस शिपाई ताराबाई गणपत खांडेकर
यांना शासकीय सेवेतून निलंबित केले. अटक केलेल्या महिला आरोपीच्या बाबतीत
योग्य ती खबरदारी न बाळगता बेजबाबदार व निष्काळजीपणाने, बेपर्वा वर्तन केल्यामुळे
आरोपी संधीचा फायदा घेऊन पळून गेली. त्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली.
त्यामुळे शासकीय सेवेतून निलंबित करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद केले आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Uttam Nagar Pune Crime News | पुणे: 17 वर्षीय मुलीवर बलात्कार करतानाचा व्हिडीओ केला व्हायरल,
आरोपी गजाआड

Pune Crime News | पुणे: अत्याचार करुन जातीवाचक शिवीगाळ, तरुणावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

You may have missed