Hadapsar Pune Crime News | नवरा बायकोच्या भांडणात पडू नको, सांगितल्याने मेव्हण्याने केले सुर्‍याने वार; हडपसरमधील घटनेत मेव्हणा, पत्नीवर गुन्हा दाखल

marhan

पुणे : Hadapsar Pune Crime News | पती पत्नीची भांडणे सुरु असताना मेव्हण्याने शिवीगाळ केली. तेव्हा पतीने आमच्या नवरा बायकोच्या भांडणात तू पडू नको, असे सांगितले. त्याचा राग येऊन मेव्हण्याने किचनमधील सुर्‍याने पतीच्या डोक्यात, डोळ्यावर वार करुन गंभीर जखमी केले. (Stabbing Case)

https://www.instagram.com/p/DAc2qhLCX9O

याबाबत दशरथ किसन गोडसे (वय ३६, रा. ढमाळवाडी, भेकराईनगर, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रशांत सुभाष नवत्रे (वय २३, रा. राजगर कॉलनी, गंगानगर कॉलनी, भेकराईनगर, हडपसर) याला अटक केली आहे. तर फिर्यादीची पत्नी पल्लवी दशरथ गोडसे हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

https://www.instagram.com/p/DAc72wopjDz

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे २६ सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता घरी गेले.
त्यावेळी त्यांची पत्नी पल्लवी व मेव्हणा प्रशांत नवत्रे यांनी भांडण करुन शिवीगाळ करु लागले.
तेव्हा फिर्यादी हे मेव्हण्यास आमचे नवरा बायकोच्या भांडणात पडु नकोस, असे सांगितले.
त्याचा त्यांना राग आला. पत्नी पल्लवी हिने हाताने मारहाण केली.
ते पत्नीस विरोध करत असताना मेव्हणा प्रशांत याने घरातील किचनमधून धारधार सुरा घेऊन आला.
या सुर्‍याने त्याने फिर्यादीचे डोक्यावर, डावे डोळ्यावर वार करुन गंभीर जखमी केले.
पोलीस हवालदार गायकवाड तपास करीत आहेत.

https://www.instagram.com/p/DAcxXzNJqtS

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Nirmala Sitharaman | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपात FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; राजकीय वर्तुळात खळबळ

Supriya Sule On Mahayuti Govt | सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला इशारा; म्हणाल्या – ‘जेव्हा निवडणुका होतील तेव्हा…’

Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)