Hadapsar Pune Crime News | जेलमधून सुटून आला तरी तुझा माज कमी होत नाही; चुस टोळीतील सराईत गुंडावर टोळक्याचा चाकूने वार
पुणे : Hadapsar Pune Crime News | जेलमधून सुटून आला तरी तुझा माज कमी होत नाही, असे म्हटल्याने सुरज चुस टोळीतील सराईत गुन्हेगाराची (Criminal On Police Record) टोळक्याबरोबर वादावादी झाली. त्यातून टोळक्याने त्याच्यावर चाकूने वार करुन जबर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
अनिकेत रवींद्र पाटोळे (वय २२, रा. धनकवडी) याने हडपसर पोलिसांकडे (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संदिप खिलारे, निलेश खिलारे, अविनाश नेटके, आकाश नेटके (सर्व रा. वैदुवाडी, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना वैदुवाडीमध्ये मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता घडली. (Stabbing Case)
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रार दिल्याच्या रागातून सुरज चुस याच्या टोळीने वैदुवाडी येथे वाहनांची व दुकानांची तोडफोड केली होती. त्यामध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी चुस टोळीतील १५ जणांवर मोक्का कारवाई केली होती. त्यात अनिकेत पाटोळे याचाही समावेश होता. त्यात त्याला आता जामीन झाला आहे. (Hadapsar Pune Crime News)
अनिकेत पाटोळे हा रात्री सिगारेट घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याच्या ओळखीचे आरोपी तेथे उभे होते.
त्यांनी फिर्यादीस बघून जेलमधून सुटून आला तरी तुझा माज काय कमी होत नाही, असे म्हणाले.
त्यावरुन त्यांच्यात वाद झाला. तेव्हा संदिप खिलारे याने फिर्यादीला पकडून ठेवले.
निलेश याने त्याच्या छातीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे अनिकेत खाली पडला.
तो उठून पळू लागला. तेवढ्यात अविनाश नेटके याने त्याच्याकडून चाकू काढून फिर्यादीला मारला.
तो डोळ्याच्या खाली लावून अनिकेत जखमी झाला. पोलीस हवालदार बारटक्के तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा