Hadapsar Pune Crime News | दारु पिऊ नका म्हणून सांगणार्‍या मुलांवर वडिलांनी केला चाकू हल्ला; हडपसरमधील घटना

Stabbing Case

पुणे : Hadapsar Pune Crime News | अनेकदा आई वडिल मुलांना दारु पिऊ नको, व्यसने करु नको, असे सांगताना दिसतात पण इथे उलटे घडले. दारु का पिता, दारु पित जाऊ नका, असे सांगणार्‍या दोन मुलांना वडिलांनी चाकूने वार (Stabbing Case) करुन जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Hadapsar Pune Crime News)

https://www.instagram.com/p/DAgYpwICfLf

याबाबत बिपिनकुमार किरण धुरिया (वय ३०, रा. आर्दशनगर, ऊरुळी देवाची) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी किरणकुमार रामेचत धुरिया यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.ही घटना फिर्यादी यांच्या राहत्या घरी १७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता घडली.

https://www.instagram.com/p/DAgV6Q6C9Cd

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऊरुळी देवाची (Uruli Devachi) येथील आदर्शनगरमध्ये फिर्यादी व त्याचे वडिल राहतात. फिर्यादी यांचा भाऊ विवेककुमार याने वडिलांना त्यांचे घरी जाऊन दारु का पिता, दारु पित जाऊ नका असे सांगितले. त्याचा राग येऊन वडिलांनी घरातील चाकू आणून फिर्यादीच्या भावाच्या डाव्या हातास मारला. फिर्यादी हे सोडविण्यासाठी गेले असताना त्यांच्याही डाव्या हाताच्या दंडावर चाकू मारुन जखमी केले. पोलीस हवालदार भोसले तपास करीत आहेत.

https://www.instagram.com/p/DAgTgqhpfwZ

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Nirmala Sitharaman | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपात FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; राजकीय वर्तुळात खळबळ

Supriya Sule On Mahayuti Govt | सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला इशारा; म्हणाल्या – ‘जेव्हा निवडणुका होतील तेव्हा…’

Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)